Bhushan Gavai on Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर खंडपीठ देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड ठरेल. सर्किट बेचचं रुपांतर लवकरच कायमस्वरुपी खंडपीठमध्ये होईल, पुढील 10 वर्षात याच खंडपीठातून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तयार होतील, असे उद्गार देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले. मी कधीच सर्किट बेंच म्हणणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आराध्ये यांनी सर्किट बेंचच्या पर्मनंट बेचसाठी प्रस्ताव पाठवावा, माझ्याकडे सव्वा तीन महिन्यांचा कालावधी आहे तो सुद्धा कमी नाही, अशा शब्दात त्यांनी कायमस्वरुपी खंडपीठासाठी शब्द दिला. भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्धाटन करण्यात आले. गवई यांचे कोर्ट परिसरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारत, ताराबाई इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कोल्हापूर सर्किट नियुक्त न्यायमूर्ती यांच्यासह सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वकील, बार कौन्सिलचे प्रतिनिधी उपस्थित होते. गवई यांनी आपल्या भाषणातून खंडपीठासाठी खारीचा वाटा उचललेल्या प्रत्येक घटकाचा उल्लेख करत आभार मानले. अवघ्या 20 दिवसांमध्ये सर्किट बेंचसाठी इमारत तयार करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमचे त्यांनी विशेष आभार मानले.  

सहा जिल्ह्यातील पक्षकारांबरोबर वकिलांसाठी खूप मोठी संधी 

ते पुढे म्हणाले की, सहा जिल्ह्यातील पक्षकारांबरोबर वकिलांसाठी खूप मोठी संधी निर्माण केली आहे. कोल्हापूर खंडपीठातून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निर्माण होतील यामध्ये मला अजिबात शंका नाही. महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर खंडपीठाच्या इंट्रास्ट्रक्चर साठी लागेल ती मदत करेल. त्यांनी सांगितले की, अजितदादा आज उपस्थित नाहीत नाही, तर मुख्यमंत्री समोरच मी सांगितलं असतं. केवळ पुणे बारामती करू नका पुणे कोल्हापूर एक्स्प्रेस वे तयार करा, असेही ते म्हणाले.

आराध्ये साहेब तुम्हाला देखील आशीर्वाद मिळेल

त्यांनी सांगितले की, अंबाबाईचा आणि कोल्हापूरकरांचा आशीर्वाद खूप मोठा असतो. शाहू महाराज यांना कोल्हापूरकरांचा आशीर्वाद मिळाला आणि ते दिल्लीला पोहोचले. आराध्य साहेब तुम्हाला देखील अंबाबाईचा आणि कोल्हापूरकरांचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही देखील लवकरच दिल्लीला याल. राजर्षी शाहू महाराज यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. त्यामुळे छोटीशी परतफेड करण्याची मला संधी या निमित्ताने मिळाली. सरन्यायाधीश होऊन आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आज मला झाला. 

सर्किट बेंचचे आपण लवकरच खंडपीठात रूपांतर करणार आहोत

कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे आपण लवकरच खंडपीठात रूपांतर करणार आहोत. जे महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागे आहे असं म्हणतात त्यांना कामातून उत्तर दिलं आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून न्यायदानाचे काम इथून होईल अशी अपेक्षा ठेवतो. आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीत जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत या देशातील नागरिकांचे भलं होणार नाही असे बाबासाहेब म्हणायचे. कोल्हापूरमध्ये खंडपीठ निर्माण होणे आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाऊल टाकणारा मैलाचा दगड असेल.

न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे

गवई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शाहू आंबेडकरांचा विचार मनावर कोरला गेला आहे. माझ्या जडणघडणीत  बाबासाहेबांच्या जडणघडणीत शाहूंचा मोठा वाटा आहे. कोल्हापूरमध्ये दाखल झाल्यानंतर शाहूंच्या वारसांनी स्वागत केलं यापेक्षा मोठा सन्मान नसल्याचे ते म्हणाले. मी निमित्त असून मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराध्ये यांनी अधिसूचना काढली नसती, तर सर्किट बेंच झालं नसतं, असेही गवई म्हणाले. 

कोल्हापूरचे खंडपीठ होणार आहे त्यामुळे आत्ताच खंडपीठ म्हणतो

गवई यांनी कोल्हापूर सर्किट बेंच असा उल्लेख न करता खंडपीठ असाच उल्लेख केला. ते म्हणाले की, कोल्हापूरचे खंडपीठ होणार आहे त्यामुळे आत्ताच खंडपीठ म्हणतो. आज आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. गेल्या 15 वर्षांपूर्वी मी या स्वप्नात सहभागी झालो, देवेंद्र फडणवीस 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर ते देखील या स्वप्नात सहभागी झाले.  माझ्यावर राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे. आपल्याला मिळालेलं राजवैभव आपल्यासाठी नाही तर जनतेवर उधळण्यासाठी आहे असं शाहू महाराज म्हणाले होते. शाहू महाराज यांना खूप कमी आयुष्य मिळालं, पण तरी देखील गोरगरीब, दलित जनतेसाठी काम केलं. एका दलिताला हॉटेल काढून दिले आणि स्वतः त्याठिकाणी चहा प्यायला गेले. आरक्षणाचा पहिला कायदा हा देखील शाहू महाराज यांनी केला. यावेळी सरन्यायाधीशांनी कविता सुद्धा वाचली. त्यांनी पुढे सांगितले की, डॉ. बाबासाहेब यांच्या जडणघडणीत शाहू महाराज यांचा मोठा वाटा राहिला आहे. बाबासाहेबांना मूकनायक सुरू करण्यासाठी त्या काळात शाहू महाराजांनी 3 हजार रुपये दिले होते.  ते म्हणाले की, बाबासाहेब हिंदुस्थानचे पुढारी होतील हे शाहू महाराज यांनी सांगितलं होतं ते खरं झालं. त्याच शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज काल विमानतळावर स्वागताला आले, मी त्यांना म्हणालो तुम्ही कशाला आलात स्वागताला मी आशिर्वाद घ्यायला येणार होतो. 

20 दिवसात ही इमारतीची पुनर्बांधणी केली

न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळेच न्यायासाठी दूर जावं लागणाऱ्या सहा जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्किट बेंच मंजूर केले. मात्र, हे करत असताना इमारतीबद्दल उच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले. इतर राज्याच्या तुलनेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र मागे आहे असं म्हटलं जातं, पण त्यांना एकनाथ शिंदे यांच्या कामाबद्दल माहीत नसावं. ज्या ठिकाणी शाहू महाराज यांनी न्यायदानाचे काम केलं त्या जुन्या कोर्टाच्या इमारतीचा पर्याय उभा राहिला. आम्ही मोबाईलवर फोटो आणि व्हिडीओ पाहिले आणि अवघ्या 20 दिवसात ही इमारतीची पुनर्बांधणी केली. 20 दिवसात खंडपीठासाठी इमारत तयार करून टीकाकारांना कार्यानं उत्तर दिलं. अतुल चव्हाणांची टीम नसती, तर काम झालं नसतं, असेही त्यांनी नमूद केले. 

इतर महत्वाच्या बातम्या