एक्स्प्लोर

'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होईल असा हा प्रसंग आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता यावी यासाठी गेल्या 40-50 वर्षापासून प्रयत्न सुरू होते.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी आपल्या पदाचा पदभार आज (16 फेब्रुवारी) स्वीकारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी आमदार विनय कोरे यांनी महापौर दालनाची फीत कापून आणि श्रीफळ वाढवत आत प्रवेश केला. चंद्रकांत पाटील यांनी नूतन महापौरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा पहिल्यांदाच महापौर झाल्याचा आनंद सर्वांना झाल्याचे सांगत नगरसेवकांनी कस काम केलं पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी देता येईल असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाणार नाही, असा स्पष्ट इशारा नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी दिला.

भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होईल 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होईल असा हा प्रसंग आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता यावी यासाठी गेल्या 40-50 वर्षापासून प्रयत्न सुरू होते. आता भाजपची सत्ता आल्याने कौतुक म्हणून महापालिकेत आलो. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये ढवळाढवळ करण्याचा आमचा हेतू नाही.  ज्यांना निवडून दिलं आहे ते समर्थ आहेत. विकासकामात अडथळा निर्माण करण्याचे काम आणि त्यामधून स्वतःचे काही काम नगरसेवकांनी करू नये, त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप पैसे देणार आहेत. एकनाथ शिंदे, सुनेत्रा वहिनी तिघे मिळून कोल्हापूरच्या विकासाला खूप पैसे देतील.  केंद्राने आपल्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या विविध विकासकामांना मोठं बजेट दिलं आहे. यामध्ये सांडपाणी निर्गत प्रकल्पाचे, शुद्ध पाणी प्रकल्प, उड्डाणपूल असतील. या सर्व विकास कामांमध्ये नगरसेवकांनी सहकार्य केलं पाहिजे असे ते म्हणाले. 

जनसुराज्य आणि भाजप दोन शरीर आणि एक आत्मा  

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर झेडपी अध्यक्षपदावर भाष्य केलं. ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा असा आमचा आग्रह आहे. जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी हे दोन शरीर आणि एक आत्मा आहे. त्यामुळे 12 अधिक 6 अशी 18 आकडेवारी आमच्याकडे आहे. त्यामुळे 18 आणि 20 (राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा) मध्ये फार फरक राहत नसल्याचे ते म्हणाले.

आम्हाला देखील अध्यक्षपद आणि समित्या मिळाल्या पाहिजेत

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा भाऊ कोण यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. खासदार महाडिक यांनी मतांचे गणित मांडलं आहे. सर्वाधिक जागा निवडून आल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल असे स्पष्टपणे मुश्रीफ यांनी सांगितल्यानंतर आता महाडिक यांनी म्हटलं आहे की भाजपला सर्वाधिक तीन लाख 42 हजार मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीला तीन लाख 41 हजार मते मिळाली आहेत. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आहे. त्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे. जिल्ह्यातील जनेतनं भाजपवर विश्वास ठेवला आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत, तर आम्हाला देखील अध्यक्षपद आणि समित्या मिळाल्या पाहिजेत, असे महाडिक यांनी नमूद केले. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
Iran vs Israel war: इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget