बेळगाव : अनेकदा पोलीस म्हणजे गोरगरिबांचं, सर्वसामान्यांचं न ऐकणारा, जराशी चूक दिसली की पैसे उकळणारा अशीच प्रतिमा पोलिसांनी बनली आहे. मात्र, सदरक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रीदला घेऊन काम करणाऱ्या खाकी वर्दीतल्या पोलिसांची, अधिकाऱ्यांचीही कमी नाही. पोलिसांत दडलेला हा खमक्या अधिकारी आणि संवेदनशील माणूसही कित्येकदा पाहायला मिळतो. बेळगावचे (Belgaon) पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे (SP) यांच्या संवेदनशीलपणा बेळगावच्या वीर राणी कित्तूर चन्नम्मा चौकात पाहायला मिळाला. पावसात भिजणाऱ्या 

Continues below advertisement

कडक शिस्तीचा, कायद्याचे पालन करणारा, प्रसंगी लाठी उगारणारा असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण या खाकी वर्दीच्या आतमध्ये एक संवेदनशील माणूस देखील असतो याचे दर्शम बेळगावच्या पोलीस आयुक्तांच्या कृतीतून घडले. बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या संवेदनशीलपणा बेळगावच्या वीर राणी कित्तूर चन्नम्मा चौकात पाहायला मिळाला.

भाजपच्या आंदोलनासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने  चौकात जमले होते. एकीकडे घोषणाबाजी सुरु होती, रस्त्यावर धरणे सुरु होते. आंदोलन सुरू असतानाच अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. आंदोलन सुरु असताना पावसाचा जोर वाढला आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या काही वृद्धांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधावा लागला. त्यावेळी बंदोबस्ताचे निरीक्षण करत असलेले बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव  बोरसे यांनी वृद्ध आंदोलकांना पावसात भिजत असलेले पाहिले, त्यानंतर पुढे येत त्यांनी या वृद्ध आंदोलकांना आपल्या छत्रीत घेतले. पोलिस आयुक्तांची ही एकदम साधी वाटणारी कृती पण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरली. घडला प्रसंग साधा पण पोलीस अधिकाऱ्याच्या संवेदनशील पणाचे दर्शन घडवणारा ठरला.

Continues below advertisement

भूषण बोरसे मूळ धुळ्याचे

दरम्यान, एसपी महोदयांचा हा व्हिडिओ आजच्या आंदोलनातील सर्वात चर्चेचा विषय ठरला, तसेच व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटीझन्सकडून या व्हिडिओचं कौतुकही केलं जात आहे. भूषण बोरसे हे 2009 च्या युपीएससी (आयपीएस) बॅचचे अधिकारी आहेत, ते कर्नाटक कॅडरचे अधिकारी आहेत. यापूर्वीही त्यांनी विविध ठिकाणी पोलिस दलातील महत्त्वाच्या पदांवर कार्यभार सांभाळला आहे. भूषण बोरसे हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांनी पुणे विद्यापीठातून (Pune University) केमिकल इंजिनिअरिंग आणि एनआयटी, जमशेदपूर येथून एम. टेक. पदवी प्राप्त केली आहे.

हेही वाचा

हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर