Kolhapur Crime: अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातामध्ये कुटुंबातील पत्नी आणि दोन मुलांना डोळ्यादेखत गमावल्यानंतर तेव्हापासून  नैराश्यात गेलेल्या वडिलांनी त्याच ठिकाणी आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना शेवटचा हार अर्पण करून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विराट विठ्ठललाल गौतम (वय 58) असं या वडिलांचे नाव आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी कोल्हापुरात पुईखडीजवळ खासगी बस उलटून झालेल्या अपघातात विराट गौतम यांच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा डोळ्यादेखत मृत्यू झाला होता. ते या अपघातात बचावले होते. 

Continues below advertisement

खिशातील ओळखपत्रावरून ओळख पटली

शुक्रवारी सकाळी काही वाहनधारकांना घाटात त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. करवीर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे कोल्हापूर आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भीषण अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने विराट गौतम नैराश्याच्या गर्दीत गेले होते. त्यामुळे ते अपघात झाल्या ठिकाणी बसून रडत होते. त्यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी अत्यंत हृदयद्रावक शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की मी माझा देह आज त्यागत आहे नीलू रसिका आणि सर्विल शिवाय मी अडीच वर्ष कसा जगलो माहित नाही माझे जग त्या क्षणी संपलं होतं त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली आहे.

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

आज कोल्हापूरमध्ये देहत्याग केला आहे. कसं जगतोय माहीत नाही. जगामध्ये काही लोक अशी असतात ज्यांच्याशिवाय जगणं कठिण असतं. असं वाटतं की, ती लोक जगातून निघून गेल्यानंतर आम्ही कसे जगणार. माझं जग तेव्हाच संपलं होतं. गेल्या अडीच वर्षांपासून नीलू, रसिका आणि शर्विलशिवाय कसं जगलो हेच मला माहीत नाही.विराट विठ्ठललाल गौतम पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. 

Continues below advertisement

तेव्हा विराट जखमी अवस्थेत बचावले

त्यांनी कोल्हापूर-राधानगरी रोडवरील पिरवाडी-पुईखडी घाटात आपले जीवन संपवले. हे तेच ठिकाण आहे जिथे त्यांच्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला होता. याच ठिकाणी 23 नोव्हेंबर 2023 रोजी गोव्याहून मुंबईला जाणारी एक खासगी बस या घाटात उलटली होती. या अपघातात विराट यांची पत्नी नीलू (43), मुलगी रिद्धिमा (17) आणि मुलगा सार्थक (13) यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी विराट हे जखमी अवस्थेत बचावले होते. कुटुंबाला गमावल्यानंतर विराट हे प्रचंड नैराश्यात होते.ते नियमितपणे या अपघातस्थळी येऊन आपल्या कुटुंबीयांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहत असत. 

इतर महत्वाच्या बातम्या