Ajit Pawar : राज्यात झालेलं सत्तांतर सर्वसामान्य जनतेला पटलं असं वाटत नाही, पदवीधर आणि शिक्षकांनी आपला कल दिला आहे, आता आम्ही पुढच्या निवडणुकांची वाट पाहत आहोत, जनता सुद्धा निवडणुकीची वाट पाहत असल्याचा कडक इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar In Kolhapur) यांनी कोल्हापुरातून (Kolhapur News) देवेंद्र फडणवीस यांना दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून जनतेने सेनेचे आमदार निवडून दिले. मागेही दोनवेळा अशी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारलं आहे. इजा, बिजा झाले आता तिजा होईल, अशा शब्दात अजित पवारांनी हल्ला चढवला. पुण्याती पोटनिवडणुकीत भाजपसमोरील बटण दाबून अजित पवारांना 440 चा करंट द्या म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही त्यांनी खोचक टोला लगावला.


440 पेक्षा मोठा करंट आहे का बघा


अजित पवार म्हणाले की, 440 पेक्षा मोठा करंट आहे का बघा, तोच करंट बावनकुळेंना द्यायला पाहिजे. पाच वर्षे तुम्ही मंत्री असताना तुम्हाला पक्षाने तिकीट दिल नाही. तुमच्या पत्नीला तिकीट दिलेलं नाही, मग कशाला बोलता? स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याबद्दल काही तरी बडबडायाचे हे योग्य नाही. भाजपकडून सुरु लोकसभा प्रवास योजनेवरूनही अजित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आम्हीही मतदारसंघात जावून काम करत असतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बळकटीकरण व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतात, ते आमचं कामच आहे. त्यानिमित्ताने अनेक लोक भेटत असतात. त्यांच्या काही तक्रारी असतात, त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. 


अजित पवार कोल्हापूर जिल्हा बँकेवर चौकशीवर म्हणाले


शेतकऱ्यांच्या मालकीच्या बँकेवर कारवाई करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक आणि इतरांना आहे. चौकश्या होत असतात, त्यामुळे चौकशी होवू दे, पण तिथं काम करत असताना तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.  


बारामतीचे मतदार त्यांचे ते बघतील


अजित पवार यांनी बबनराव लोणीकरांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. तुम्ही तुमचं बघा, बारामतीची काळजी करू नका. दुसऱ्यांनी येऊन फुकटचा मुक्त सल्ला बारामतीकरांना देण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या