कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) किल्ले विशाळगडवर 14 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले. अजित पवार यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला. पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कोणत्या पद्धतीने हल्ला करण्यात आला याचा भयावह अनुभव सांगितला. यावेळी विशाळगडावरील महिला सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी गजापुरात पोहोचल्या. यावेळी महिलांनी सुद्धा आपल्या वेदनांना अजित पवार यांना कथन केल्या.
कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर भाष्य केले. अजित पवार यांनी पडितांच्या वेदनात जाणून घेत असतानाच त्यांना मध्येच थांबून अतिक्रमण संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी आत्ताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. विशाळगडावरील ज्या व्यवसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झालं आहे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही असे अजित पवार यांनी यावेळी पीडितांना सांगितले. यावेळी एका पीडिताने सिलेंडर फोडल्याचं सांगितलं. या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला असून तर त्याचा हात-पाय फ्रॅक्चर झाला असून तो मिरजेत उपचार घेत असल्याचे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या