कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (27 एप्रिल) जाहीर सभा होत आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानात ही सभा होत असून या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मोदींच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे कोल्हापुरात
आज मोदी यांची सभा पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज, हातकणंगलेमधील उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर मतदारसंघांमध्ये दौरा होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता त्यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ पेठवडगावमध्ये नगरपालिका चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे. यानंतर कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांची सभा होईल. कोल्हापूरचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ हिंदमाता तालीम चौक, उचगावमध्ये त्यांची सभा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या