कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) अध्यक्ष असेलेल्या कोल्हापुरातील केडीसीसी बँकेच्या वारणानगर शाखेत 3 कोटी 22 लाखांचा घोटाळा झाल्याच उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणी वारणा शाखेतील पाच कर्मचाऱ्यांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चार कर्मचाऱ्यांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. याममधील एक जण फरार आहे.

ग्राहकांच्या खात्यावरील परस्पर रक्कम काढली

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात केडीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार संबंधीची महत्वाची कागदपत्रे आणि केवायसीची तपासणी सुरू असताना हा घोटाळ्याचा प्रकार उडकीस आला.  स्लीप आणि चेकवर खातेदाराच्या खोट्या व बोगस सह्या करुन तसेच खातेदारांच्या नावाने बोगस खाती उघडून त्यातून रक्कमा काढण्यात आल्या. खातेदारांची बंद खात्यावरील रक्कमा काढून घेतल्याचही समोर आले. त्यामुळे जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर यांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वारणानगर शाखेतील पाच जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा बँकेच्या वारणा शाखेचा शाखाधिकारी शोध सुरु

पन्हाळा तालुक्यातल्या मालेतील लिपिक मुकेश पाटील, आरळेतील कँशियर शिवाजी पाटील, कोडोलीतील महिला कँशियर मिनाक्षी कांबळे, शरिफ मुल्ला या चौघांना पोलिसांनी अटक केली. तर जिल्हा बँकेच्या वारणा शाखेचा शाखाधिकारी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील तानाजी पोवारचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकारणाचा पुढील तपास आर्थीक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या