Chitra Wagh In Kolhapur : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी 45 आणि विधानसभेला 288 पैकी 200 जागा जिंकू, असा विश्वास भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. चित्रा वाघ आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महिला सुरक्षा हा आमचा अजेंडा असल्याचेही त्या म्हणाल्या. भाजपचे नेते हेकडी नाहीत, सगळ्यांचे सल्ले ऐकून घेतले जातात. चांगला सल्ला असेल तर स्वीकारतात, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्रावर दिली. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी मतदारांनी दिलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्या म्हणाल्या की, नितेश राणे कोणत्या कार्यक्रमात बोलले किंवा त्यांचे काय वक्तव्य हे पाहिलेलं नाही. खरंच असं बोलले असतील, तर ते योग्य नाही. भाषण पूर्ण ऐकून प्रतिक्रिया देईन. 


चित्रा वाघ म्हणाल्या, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आजपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आजपासून सुरू होत आहे. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे ही आमची जबाबदारी आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली आहे. 


लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा आणि 288 पैकी 200 विधानसभेच्या जागा जिंकू 


चित्रा वाघ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 45 आणि विधानसभेला 288 पैकी 200 जागू, असा आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला मोर्चा देखील बुथवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, निर्भया पथकातील गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, निर्भया पथकाच्या गाड्या सर्वच पक्षातील नेत्यांनी वापरल्या आहेत. ज्यांनी टीका केली त्या सुप्रियाताई सुळे (Chitra Wagh on Supriya Sule) यांनी देखील निर्भया पथकातील गाडी वापरली आहे. हळूहळू या गाड्या जमा करून महिलांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जातील.


लव्ह जिहाद कायदा आणावा अशी मागणी केली जाणार


चित्रा वाघ यांनी महिला तक्रारी मोठ्या संख्येनं रजिस्टर व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, त्यामुळे महिलांची छेड काढणाऱ्यावर कारवाई करता येईल. नागरिकांनी देखील चुकीच्या घटना घडत असेल तर थांबून मदत करावी, पोलिस आणि सरकार आपलं काम करत राहणार आहे. कोणत्याही पोलिस (Maharashtra Police) अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कसूर केली असेल, तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. लव्ह जिहाद हा प्रश्न संपूर्ण राज्यात पोहोचला असून मुली वयात येण्याचं वय कमी झालं आहे. उत्तर प्रदेश सारखा लव्ह जिहाद कायदा आणावा अशी मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या