Kolhapur Heavy Rain : कोल्हापुरातून पावसासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इशारा पातळी गाठली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 5 इंच इतकी असून जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी अतिशय संथ गतीने वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरून न जाता सतर्क राहणे गरजेचे आहे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. मध्यरात्री 3 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत हे दरवाजे बंद झाले. याचा अर्थ घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोकादायक ठिकाणाहून वाहतूक करू नये, असं आवाहन ही प्रशासनाने केलं आहे.
संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या 24 तासात 43 मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला तर संभाव्य पूर स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. तसंच कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावरती आज ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागातील नागरिकांना स्थलांतरणासाठी सूचना देण्याचे काम प्रशासनाने सुरुवात केली आहे. कोणतेही आपत्ती जनक पूरस्थिती निर्माण झाल्यास सामना त्याचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज असून कोयना आणि वारणा धरणातून होणारा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली आहे.
कधी कुठे कोणता अलर्ट
- 20 ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट – *रेड अलर्ट*
सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, मराठवाडा व विदर्भ – यलो अलर्ट
- 21 ऑगस्ट : पुणे घाट – रेड अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, सातारा घाट, पुणे शहर, सातारा शहर – *यलो अलर्ट*
- 22 ऑगस्ट : पुणे घाटमाथा – यलो अलर्ट
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठच्या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून हवामान विभागाच्या सूचना पाळाव्यात, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
संबंधित बातमी: