Kolhapur Accident News : भावाकडून बहिणीसह दाजी बेपत्ता झाल्याची तक्रार, त्याचवेळी भीषण अपघात, कार शंभर फूट खाली कोसळली अन्..
Kolhapur Accident News: भावाकडून बहिण आणि दाजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, तक्रार दाखल करून काही तासही होत नाहीत तोपर्यंत त्यांचाच अपघात झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली.

Kolhapur Accident News कोल्हापूर : भावाकडून बहिण आणि दाजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, तक्रार दाखल करून काही तासही होत नाहीत तोपर्यंत त्यांचाच अपघात झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात (Kolhapur Accident News) घडली. सुदैवाने हे दाम्पत्य जखमी झाले असून उपचारासाठी (Accident News) सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दत्तात्रय रघुनाथ पवार (वय 32 रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (वय 28 रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे.
Kolhapur Accident News : नेमकं काय घडलं?
सातेरी देवीवरून दर्शन करून खाली येत असतानाच वाघोबावाडीला जाणाऱ्या घाटात शंभर फूट खाली शेतामध्ये पवार दाम्पत्याची इको कार (MH.09.GU.5635) कोसळली. इको कारमध्ये पती-पत्नी दोघेही होते. अपघातानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी 108 ॲम्बुलन्सने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
Car Accident in Sateri Valley of kolhapur : भावाकडून बहिण आणि दाजी बेपत्ता असल्याची तक्रार
दुसरीकडे, बहिण आणि दाजींचा कोणताही पत्ता लागत नसल्याने अतुल कृष्णा शिंदे (वय 34 रा. 243, शनिवार पेठ, पाठण कॉलनी, कराड, ता. कराड जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. अतुल शिंदे यांनी काल (7 ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास सांगरुळ (ता. करवीर) येथून दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दोघेही न सांगता निघून गेल्याने आणि त्यांच्याकडे कोणताही संपर्क होत नसल्याने अतुल शिंदे यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
अतुल शिंदे यांनी आज सकाळी (7 ऑक्टोबर) फिर्याद दाखल केली असतानाच बहिण अश्विनी आणि दाजी दत्तात्रय हे सातेरीच्या दर्शनाला गेले असतानाच परतून येत असतानाच त्यांच्या अपघाताची सुद्धा बातमी येऊन धडकली. यानंतर दोघांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमागे काही घातपात आहे का? की यांचा अपघातच झाला होता, या संदर्भात पुढील तपास पोलिस करत आहेत.
Manache Shlok movie Controversy : मनाचे श्लोक चित्रपट वादाच्या भवऱ्यात
मनाचे श्लोक चित्रपट वादाच्या भवऱ्यात, मनाचे श्लोक ट्रेझर सोशल मीडिया वरून हटवावा आणि चित्रपटाचे नाव बदलावे, अन्यथा समर्थ भक्तांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिला. “मनाचे श्लोक” या पवित्र ग्रंथाच्या नावाचा चित्रपटासाठी वापर केल्याबद्दल जाहीर निषेध श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आणि समस्त समर्थभक्तातर्फे करण्यात आला आहे. मनाचे श्लोक याचा ट्रेझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे तो हटवावा. त्याचबरोबर पवित्र हिंदू विवाह संस्था या बदलाचे चुकी चे तत्त्वज्ञान रामदासी सांप्रदायाचा आधार घेऊन जनमानसावर थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे..ते थांबवावे त्याचबरोबर मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव त्वरित बदलावे आणि तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ नये अन्यथा समर्थ भक्तांच्या रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगडचे ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिला आहे.
आणखी वाचा


















