Karuna Sharma On Walmik Karad: वाल्मिक कराड (Walmik Karad) यानेच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या केली, हा आरोप नाही, सत्यता आहे. वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांची हत्या केली. तसेच संतोष देशमुखांनी ज्यावेळी पाणी मागितलं, तेव्हा या गुंड्यांनी त्यांच्या तोंडामध्ये बाथरुम केली, असं खळबळजनक विधान करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केलं. पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलल्या होत्या, वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांच्या पोटाचे पाणी हलत नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धनंजय मुंडेंशिवाय पोटाचे पाणी हलत नाही. 2014 पासून मी बघतेय. सर्व पुरावे समोर आहेत, मग वाट कशाची बघातय?, असा सवालही करुणा शर्मांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना विचारला. एबीपी माझाशी संवाद साधताना करुण शर्मा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
महिलांबद्दल सहानुभूती असेल देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी तर धनंजय मुंडे यांना पक्षातून हकलून लावलं पाहिजे. पक्षाचा आधार घेत ही मोठं झालेली आहेत, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली. तसेच महिला आयोगात मी वेळोवेळी गेली, मात्र ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेत. आजपर्यंत महिला आयोगानं काहीच केलं नाही. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या पदावर योग्य नाही. त्या कोणालाही न्याय देत नाहीत. रुपाली चाकणकर यांनी धनंजय मुंडेंना खूप पाठिंबा दिला, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला. कालच्या निकालासाठी न्यायालयाचे धन्यवाद मानते. आम्ही 15 लाखांची मागणी केली होती, मात्र ते मिळाले नाहीत, त्यामुळे आम्ही न्यायालयात पुन्हा दाद मागणार आहोत. धनंजय मुंडेची सवय आहे, फुट टाका आणि राज्य करा... स्वतः तोंड उघडत नाही, माझ्या मुलाला उभं केलं. माझ्या मुलाला किती कॉल येत होते हे सर्वांनी बघितलं आहे. ज्या वेळी माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा माझ्या कुटुंबावर दबाव टाकला, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला.
मी तोंड उघडलं तर...; करुणा शर्मांचा इशारा-
माझ्या मुलांचा माझ्याविरोधात वापर केल्यास 1996 पासून काय काय केलं, हे मी सर्व सांगेल. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसोबत काय केलं? काय कटकारस्थान रचले. मुंडे साहेबांविरेधात काय कटकारस्थान रचले गेले? किती आका आहे?, हे मी सगळं सांगेन, असा इशारा देखील करुणा शर्मा यांनी दिला. अनेक मोठ्या गोष्टी आहे. मी तोंड उघडलं तर पंकजाताईंचं पण मंत्रिपद जाऊ शकते, असा दावाही करुणा शर्मांनी केला. तसेच तुम्ही मला रोडवर सोडू शकत नाही, मी तुमची बायको आहे, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.