Kalyan News : पाच तास रुग्णवाहिकेला उशिर झाल्याने एका महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan-Dombivli Municipal Corporation) बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या (Rukminibai Hospital) दारातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आयुक्त अभिनव गोयल यांनी मोठी कारवाई केली असून या प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. कंत्राटी पद्धतीवर असलेल्या एका मेडिकल ऑफिसरसह एका स्टाफ नर्सला कायमस्वरूपी सेवामुक्त करण्याचे आदेश दिले आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष पाहायला मिळत आहे.
आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार, चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेत राहणारी सविता बिराजदार या महिलेला केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलविण्यास सांगितले होते. मात्र तिला कळवा रुग्णालया नेण्याकरीता वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल पाच तास रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलेचा रुग्णालयाच्या दारात मृत्यू झाला. यावरुन महापालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त गोयल यांनी आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना दिले होते.
उपायुक्त बोरकर यांनी या प्रकणातील चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला. या अहवालापश्चात आयुक्तांनी सहा जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणात रुग्णवाहिका चालक हरिश्चंदर यशवंतराव, प्रमोद लासूरे, वाहन चालक मारुती निकम, सिस्टर इनचार्ज जयश्री रायकर यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. तर कंत्राटी पद्धतीवर असलेले मेडिकल ऑफिसर डॉक्टर. उमर पटेल आणि स्टाफ नर्स नमिता भोये यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ
बीड जिल्हा पोलीस दलातील आणखी दोघा कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही कारवाई केलीय. पोलीस अधीक्षकांच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या आणि वाळू माफियांना मदत केलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केल गेलंय. बाळू गहिनीनाथ बहिरवाळ हा पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या घरात गांजा ओढताना आढळून आला होता. याच अनुषंगाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर रामप्रसाद शिवनाथ कडूळे या पोलीस कर्मचाऱ्याने वाळू माफीयांना मदत केली होती. याच अनुषंगाने या पोलीस कर्मचाऱ्याला अटक देखील झाली होती. या दोन्ही प्रकरणात पोलिसांची प्रतिमा डागाळल्याने त्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या दोघांचे निलंबन करत सेवेतून बडतर्फ केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
