नागपूर : गरजू बेरोजगार उमेदवारांनी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता निकेतन आर्टस कॉमर्स कॉलेज तुळशीबाग रोड, रेशिमबाग  येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये 25 विविध औद्योगिक आस्थापना सहभागी होणार असून मॅट्रीक, नॉनमॅट्रीक, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलीटेक्नीक, पदविकाधारक, अभियांत्रिकी स्नातक, कला, वाणिज्य व विज्ञान पदवीधर, कृषी पदविका/पदवीधर, जीएनएम, एएनएम., बीएससी नर्सींग, कौशल्य प्रमाणपत्र अशा सर्व शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीची संधी प्राप्त होणार आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.


माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना रोजगाराची संधी


जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांमुलींचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह, हिस्लॉप कॉलेजजवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे माजी सैनिक प्रवर्गातून अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित 14 हजार 852 रुपये कंत्राटी पध्दतीने सहाय्यक वसतिगृह अधीक्षक 1 पद आणि सहाय्यक वसतिगृह अधीक्षका 2 पद  ( 175 दिवसासाठी ) भरावयाचे आहे.


या पदासाठी इच्छुक माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी या कार्यालयात 25 जुलै 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सेनेच्या सेवेतील संपूर्ण मुळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे. अशासकीय वसतिगृह अधीक्षक या पदासाठी सैन्यातील हवालदार किंवा त्यापेक्षा वरील हुद्यावर काम केलेल्या संवर्गातून निवड केल्या जाईल आणि अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधिक्षीका या पदासाठी माजी सैनिक विधवा यांना प्राधान्य देण्यात येईल.


इतर महत्वाच्या बातम्या


आमच्याकडे 50 % करकपातीची मागणी करत होता, आता सत्तेत आल्यावर तुटपुंजी कपात का, पेट्रोल-डिझेल दरावरुन अजित पवारांचा हल्लाबोल


Maharashtra Elections 2022 : मोठी बातमी: 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI