Jitendra Awhad मुंबई: संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी निधीवरुन वाद घालण्याचा प्रकार केला आणि त्यांची इतकी प्रकरणं बाहेर आली की बोलणंच बंद केलं असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. सामाजिक न्याय, आदिवासी आणि ओबीसींचा निधीच पहिले जातो, यांच्याबद्दल यांना प्रेमच नाही आहे. मात्र हे संविधानिक प्रावधान आहे. असे असताना शिरसाट सारख्या लढवय्या शिवसैनिकांची शेळी करुन टाकली अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर केली आहे.
देशात इतकी वाईट परिस्थिती कधीच झाली नाही- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्राचा आर्थिक गाडाच विस्कळीत झाला आहे. 1 लाख 2 हजार कोटी आणणार तरी कुठून? पुढील 5 वर्षात 10-12 कंत्राटदार आत्महत्या करतील. सध्या आर्थिक परिस्थिती संपलेली आहे, इतकी वाईट परिस्थिती कधीच झाली नाही. देशाचा आर्थिक कणा शेतकऱ्यांच्या हातात आहे. तरी शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही आहे. इलेक्शन कमिशन सरकारचं दलाल म्हणून काम करतेय, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, बिहार निवडणुका तोंडावर आहे आणि मतं कापण्याचे काम सुरु आहे. निवडणूक आयोग थोतांड आहे, त्यांनी कणा हरवला आहे . पुढच्या निवडणुका स्वतंत्र निवडणुका नसतील अशी शंका ही आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपस्थित केली आहे.
मराठी माणसासाठी जो हाक मारेल तेव्हा तेव्हा मी आहे. मराठी माझी माय आहे, मराठीनं मला ओळख दिली. हिंदी पण तेवढंच बोलतो जेवढं मला येतं. मराठी माणसांसाठी एकत्र आणण्याऱ्यांसोबत आपण आहोत असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवार यांनी केलेल्या विधानावर मी बोलणं म्हणजे मी खूपच लहान आहे. मी माझ्या माय मराठीसाठी उभं राहणार असेही ते म्हणाले.
काँग्रेसमध्ये ऐनवेळी नाराजी?
त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचे बघालया मिळाले. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे नव्यानं एकत्र आल्याने हा मिलाप नव्या राजकीय वाटचालीची नांदी असल्याचेही बोललं जात आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या कडाडून विरोधानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) हा निर्णय मागे घेतला. हिंदी सक्तीविरोधातील (Hindi Compulsory) निर्णय शासनाने मागे घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून 5 जुलै रोजी 'विजयी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा वरळी येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, महाविकस आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला अद्याप या विजयी मेळाव्याचे आमंत्रण मिळालेलं नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील ऐनवेळी नाराजी पसरल्याची माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या