Jayant Narlikar: कोल्हापूरात जन्म, केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण ते ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’; खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांची उत्तुंग कारकीर्द
Jayant Narlikar Passes Away : कोल्हापूरात जन्मलेल्या डॉ. नारळीकरांचा ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडण्यापर्यंतचा प्रवास आणि उत्तुंग कारकीर्द साऱ्यांसाठी प्रेरणादाई आहे.

Jayant Narlikar Passes Away : राज्यासह देशासाठी अतिशय दु:खद अशी बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर (Dr. Jayant Narlikar) यांचे निधन झालंय. पुण्यातील राहत्या घरीच त्यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालंय. आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. वाराणशी येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तेथूनच विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळवल्या. त्या काळात त्यांनी रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळवली.
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर किर्ती गाजवणाऱ्य डॉ. नारळीकरांना 1965 साली त्यांना पद्मभूषण, 2004 साली पद्मविभूषण, 2012 साली महाराष्ट्र भूषण, आणि 2014 साली साहित्य अकादमी पुरस्काराने ही सन्मानीत करण्यात आले आहे. कोल्हापूरात जन्मलेल्या डॉ. नारळीकरांचा ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडण्यापर्यंतचा प्रवास आणि उत्तुंग कारकीर्द साऱ्यांसाठी (Dr. Jayant Narlikar Career) प्रेरणादाई आहे.
कोल्हापूरात जन्म, केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण ते ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’
जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिजला केले. त्याकाळी जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केले होते. फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते. जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉईल यांचा समावेश व्हायचा. त्याकाळात हॉईन-नारळीकर ही थिअरी त्याकाळी प्रसिद्ध झाली होती. जगाची निर्मिती स्फोटातून झाली, या थिअरीचे दोघेही टीकाकार होते. केंब्रिजला असतांना त्या काळात त्यांनी रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळवली. त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे 1966 साली जेव्हा हॉईल यांनी केंब्रीज येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरॉटीकल अॅस्ट्रॉनॉमी’ नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता.
जयंत नारळीकर यांना 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतले. त्यानंतर जयंत नारळीकर यांनी टीआयएफआरमध्ये दाखल झाले. भारताचं आजचं खगोलशास्त्राचं जे संशोधन आणि प्रगती आहे त्यामध्ये जयंत नारळीकर यांनी पाया रचला होता. ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते.
डॉ. जयंत नारळीकरांची उत्तुंग कारकीर्द, अनेक सन्मानाने सन्मानित
डॉ. जयंत नारळीकर यांचा आंतररष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता, असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही त्यांनी केले. डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच अॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत.
हे ही वाचा
























