Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या भूमीवर पुन्हा एकदा दहशतवादाने थैमान घातले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ म्हणजेच 'द रेझिस्टंट्स फ्रंट' ने घेतली आहे. या हल्ल्यामागील सूत्रधारही उघड झाला आहे.

जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याला सैफुल्लाह कसुरी म्हणूनही ओळखले जाते. कसुरी हा भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव आले आहे. त्याला आलिशान गाड्यांचा शौक आहे आणि तो नेहमीच नवीनतम शस्त्रांनी सुसज्ज लोकांसोबत फिरतो, अशीही माहिती समोर आली आहे. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी कसुरी कुठे गेला होता?

कसुरीचा पाकिस्तानात प्रभाव आहे आणि पाकिस्तानी लष्करी अधिकारी त्याची कायम सेवा करण्यास तयार असतात. यावरून त्याचा दबदबा अंदाज येतो. तो अनेकदा पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांना चिथावणी देतो, असाही दावा केला जातो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे दोन महिने आधी, सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूरला पोहोचला होता. पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन येथे राहते.

गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा परिस्थितीचा घेतला आढावा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी गृहमंत्र्यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर, शाह यांनी लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांसह सुरक्षा अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. दरम्यान आज (23 एप्रिल) गृहमंत्री अमित शाह आज घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.

पहलगाम हल्ला घटनाक्रम 

२२ एप्रिल 

३:४५ - पहलगाम येथे गोळीबार झाल्याची माहिती 

पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी 

४ वाजून ४ मिनिटे - मोठा फौजफाटा, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल 

हल्लेखोरांकडून पर्यटक जखमी झाल्याची माहिती 

४ वाजून २९ मिनिटे - भाजप नेते रवींद्र रैना यांची प्रतिक्रिया 

४ वाजून ३० मिनिटे - हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अधिकची कुमक घटनास्थळी 

४ वाजून ३० मिनिटे - पीडीपी नेता मेहबुबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया 

संध्याकाळी ५ वाजता - जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया 

५ वाजून ३७ मिनिटे - पंतप्रधान मोदींचा अमित शाह यांना फोन 

तातडीने योग्य त्या उपाययोजना आणि घटनास्थळी जाण्याची सुचना 

५ वाजून ३५ मिनिटे - मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला राजधानी श्रीनगरमध्ये  

५ वाजून ४० मिनिटे - जखमी पर्यटक पहलगाम इस्पितळात दाखल 

५ वाजून ५७ मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया 

दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा 

६ वाजून ३ मिनिटे - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून हल्ल्याचा निषेध 

६ वाजून १९ मिनिटे - विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया 

६ वाजून ३१ मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; हल्ल्यामागील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याचे आश्वासन 

६ वाजून ३५ मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा काश्मीरसाठी रवाना 

६ वाजून २६ मिनिटे - कर्नाटकचे रहिवासी हल्ल्यात बळी ठरल्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची माहिती 

६ वाजून ४५ मिनिटे - हल्ल्यात गुजरातमधील पर्यटक बळी, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांची माहिती 

६ वाजून ४६ मिनिटे - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध 

६ वाजून ५६ मिनिटे - दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू झाल्याची राजभवनाकडून माहिती 

७ वाजून ६ मिनिटे - देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हल्ल्याचा निषेध 

७ वाजून २० मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे विमानाचे श्रीनगरच्या दिशेने उड्डाण 

७ वाजून ३५ मिनिटे- जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पहलगामच्या दिशेने रवाना 

७ वाजून ४२ मिनिटे - आर्मीच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचेन्द्र कुमार दिल्लीहून श्रीनगरच्या दिशेने रवाना 

संध्याकाळी ८ वाजता - हल्ल्यात जखमी झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची यादी जाहीर 

८ वाजून ९ मिनिटे - जम्मू काश्मीर सरकारकडून आप्तकालीन नियंत्रण कक्षाची हेल्पलाईन जारी 

८ वाजून ३२ मिनिटे- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माध्यमांना प्रतिक्रिया, महाराष्ट्रातील पर्यटक हल्ल्यात बळी ठरल्याची माहिती 

८ वाजून ४३ मिनिटे - गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये पोहचले, उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीला सुरुवात 

८ वाजून ५६ मिनिटे - श्रीनगरमध्ये स्थानिकांकडून मेणबत्ती मोर्चा 

९ वाजून १९ मिनिटे - राजधानी दिल्लीत सुरक्षा अलर्ट मोडवर 

९ वाजून ४० मिनिटे - पूंच येथे दहशतवाद्यांविरोधात स्थानिकांची निदर्शने 

१० वाजता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू 

जगभरातून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध, भारताला जगभरातून शोकसंदेश आणि पाठिंबा 

१० वाजून १८ मिनिटे - रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा शोकसंदेश तर दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला पाठिंबा 

सौदी अरेबियाच्या राष्ट्रप्रमुखांकडून आयोजित डिनर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रद्द 

२३ एप्रिल 

सौदी अरेबियाचे राष्ट्रप्रमुख मोहम्मद बिन सालेम यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध; भारतात नव्या दोन ऑइल रिफायनरीची घोषणा 

रात्री १ वाजून १३ मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोन 

दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत असल्याचे ट्रंप यांचे आश्वासन 

रात्री २ वाजून १० मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यातून संपवून भारताच्या दिशेने रवाना

रात्री २ वाजून २३ मिनिटे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अमेरिका - पेरू देशाचा दौरा अर्ध्यातून रद्दपहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी काय म्हटले?

पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरनमध्ये घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे आणि ते पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे.

संबंधित बातमी:

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पतीला मारताचं पत्नी म्हणाली, मलाही मारुन टाका, दहशतवादी म्हणाला...; हृदय पिळवटून टाकणारा थरार