Ayodhya PM Modi Visit, Jalna-Mumbai Vande Bharat Train Time Table: उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज अयोध्येत (Ayodhya) पंतप्रधान मोदी (PM Modi) पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं (Ayodhya Railway Station) उद्घाटन करतील. एक नाही, दोन नाही तर तब्बल 6 वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) गाड्यांना पंतप्रधान मोदी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये जालान-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा (Jalna-Mumbai Vande Bharat Express) समावेश आहे. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे, हे मात्र नक्की. 


मध्य रेल्वेनं जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) ट्रेनचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून वेगवेगळ्या शहरांदरम्यानच्या 2 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. 


जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक (वन-वे)


30 डिसेंबर 2023 रोजी 8 डब्ब्यांची वंदे भारत विशेष ट्रेन 02705 जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) जालन्याहून सकाळी 11 वाजता रवाना होईल. जालन्याहून रवाना झालेली ही गाडी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी औरंगाबादला पोहोचणार असून 11 वाजून 57 मिनिटांनी प्रस्थान करेल. त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनवर 13:42 hrs/13:44 hrs, नाशिकरोड - 14:44 hrs/14:46 hrs, कल्याण जंक्शन - 17:06 hrs/17:08 hrs, ठाणे - 17:28 hrs/17 :30 तास, दादर - 17:50 तास/17:52 तास, सीएसएमटी मुंबई - 18:45 तास पोहोचेल पोहोचेल.


'या' वंदे भारत ट्रेनलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील


जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या उदघाटन सेवेचं स्थानकांवर खासदार, आमदार, पालकमंत्री, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, मंगळुरू-मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस, अयोध्या धाम-आनंद विहार टर्मिनल ( दिल्ली) वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील


पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा-अयोध्या-दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) अमृत भारत एक्सप्रेस, मालदा टाउन-बंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील, जिथे ते राज्यातील 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांचे प्रकल्प समाविष्ट आहेत.