Petrol  Diesel News : राज्यातील अनेक भागात इंधनाचा तुटवडा भासत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना 5 टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि शासकीय सेवेतील वाहनांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

Continues below advertisement

 कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनर मध्ये पेट्रोल डिझेल देण्यास बंदी

इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेत सर्व पेट्रोल पंपांना पाच टक्के इंधनसाठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवा तसेच शासकी वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकारी अशीमा मित्र यांनी आदेश काढलेत. तसेच या आदेशात पेट्रोल पंपावर कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनर मध्ये पेट्रोल डिझेल देण्यास देखील बंदी घातली आहे, या संदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती नागरिकांची डिझेल खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे त्या पार्श्वभूमी जालना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

हिंगोलीत आज सलग चौथ्या दिवशी डिझेलचा तुटवडा कायम, पेट्रोल पंप बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा

हिंगोली जिल्ह्यांमध्ये डिझेलचा तुटवडा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा ठणठणाठ झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळं अनेक पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकरी आणि वाहन चालकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळालं होती. हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंप वर मध्यरात्रीपर्यंत डिझेल साठी वाहनांच्या शेतकऱ्यांच्या रांगा होत्या. आज तरी हे चित्र बदलेल अशी अपेक्षा होती. मात्र आजही डिझेलची टंचाई कायम असल्याचे पाहायला मिळते. 

Continues below advertisement

बीड मधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी; कॅन मधून ट्रॅक्टर साठी डिझेल

बीड मधील पेट्रोल पंपावर पुन्हा वाहनधारकांची गर्दी होऊ लागलीय. सकाळपासूनच डिझेल आणि पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा लागल्यात. तर दुसरीकडे खरीप हंगामासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीकाम सुरू आहे. याच करिता ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल कॅन मधून नेले जात आहे. पेट्रोल पंपावर इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचं पेट्रोल पंप चालकांकडून सांगितलं जात असलं तरी नागरिकांकडून मात्र याबाबत रोष व्यक्त केला जातोय.