Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी आज सरकारच्या शिष्टमंडळाने यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आता मागे हटणार नाही. 29 ऑगस्टला आंदोलन होणारच असल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे. 

Continues below advertisement

सरकारच्या शिष्टमंडळासोबत काय झाली चर्चा?

29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत आंदोलन होणार आहे. ज्या नोंदी शोधल्या आहेत, त्या सर्वांची प्रमाणपत्र 28 ऑगस्टच्या आतमध्ये सरकारनं द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. आता आंदोलन थांबणार नाही, 29 ऑगस्टला आंदोलन होणार असल्याचे पाटील म्हणाले. या प्रकरणात आतापर्यंत ज्यांच्यावर केसेस दाखल झाल्या आहेत त्या मागे घेण्यात याव्यात अशी मागणी जरांगे यांनी केली. ज्यांच्या नोंदी सापडल्या असूनही त्यांना प्रमाणपत्र दिली जात नाहीत, अशांनी 28 ऑगस्टला आंतरवली सराटीमध्ये यावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. 

 28 ऑगस्टच्या आत निर्णयांची अंमलबजावणी करा 

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलतीबाबतचा निर्णय 28 ऑगस्टच्या लागू करा असी मागणी जरांगे पाटील यांनी केली. मराठा आंदोलकावरील केसेस मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा सांगितले आहे. बलिदान दिलेल्या बांधवांचा निधीचा विषय राहिला आहे, तो पूर्ण करा असेही सांगितले आहे. विशेष म्हणजे सातारापुणे, बॉम्बे औंध गॅझेटर संबंधीचा जी आरची मागणी आहे, ती पूर्ण करा असेही सांगितल्याचे जरांगे म्हणाले. ज्यांचे प्रमाणपत्र, व्हॉलिडिटी राहिली असेल त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवाली मध्ये यावं असं आवाहन देखील जरांगेंनी केलं. 

Continues below advertisement

दाखल्यांमध्ये विलंब आणि विसंगती यामुळे मराठा समाजात रोष : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

दरम्यान, दाखल्यांमध्ये विलंब आणि विसंगती यामुळे मराठा समाजात रोष आहे असल्याचे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. या प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना सवलती मिळत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. परंतु शासनाला बदनाम करण्याची भूमिका काही अधिकारी घेत आहेत. या सगळ्याची गंभीर दखल ही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. पुन्हा असे प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ, असं विखे पाटील म्हणाले.