Manoj Jarange Patil : आमचे सगळे बांधव आता ताकतीने कामाला लागले आहेत. 123 गावातील सर्व प्रमुख मराठा बांधव आज आले होते. मराठ्यांनी आता आपल्या गावातील गाड्या बाहेर काढून आंतरवाली सराटीला यावं असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. जातीच्या भिंतीचा यामध्ये काही संबंध नाही. मराठ्यांच्या विरोधात जाणं, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणं हे सामान्य ओबीसींना देखील मान्य नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

कोणत्या मायक्रो ओबीसींना शिक्षण नीट आहे, कोणत्या मायक्रो ओबीसीसिंना जागा नीट खाऊ दिल्या, नोकरीतल्या? 50 वेळा राजकारण राजकारण म्हणतात कोणत्या ओबीसींना राजकारणातल्या जागा खाऊ दिल्या? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी केला. कोणत्या मायक्रोओबीसींचा माणूस राजकारणात घुसवला? कोणता ओबीसी राजकारणाच्या पदावर तुम्ही बसवलं? सगळ्या गरीब मायक्रो ओबीसींच्या जागा यांनी हडपल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

ओबीसी मराठा समाजामध्ये कोणताही वाद नाही

तुम्हाला वाटतं ओबीसी अडाणी आहे, पण तो सगळ्यात हुशार आहे. ओबीसी मराठा समाजामध्ये कोणताही वाद नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षण दिले पाहिजे, असं ओबीसींच देखील म्हणणं आहे. एवढी साफ नियत ओबीसींची असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. नेत्यांना गरीब ओबीसींच काही देणे-घेणे नाही, ते मराठ्यांच्या विरोधात फिरवत आहेत असे जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement

मी आंदोलनावर ठाम

मी आंदोलनावर ठाम आहे. उदय सामंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, याबाबत विचारले असता जरांगे म्हणाले की, मला याबाबात माहिती नाही. त्यांचा काय उद्देश आहे हे माहित नसल्याचे जरांगे म्हणाले. दरम्यान, येत्या 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोणाला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी आज त्यांची 123 गावातील सर्व प्रमुख मराठा बांधवांसोबत बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.

सरकारनं डाव टाकला तर मराठे देखील सरकारवर डाव टाकणार

सरकारनं डाव टाकला तर मराठे देखील सरकारवर डाव टाकणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मुंबईतील आख्खे मराठा एक झालेत. ते कधीही मुंबईला या असे म्हणतात, त्यांचा आम्हाला गर्व असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते सज्ज झाले आहेत. सरकानं डाव टाकूद्या पुढची रणणिती काय ते समजेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.