Manoj Jarange Patil Health update News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना कालच छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली आहे. अशक्तपणा आणि ताप आल्याने अंतरवाली सराटी येथे त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, तब्येत ठीक नसल्यामुळे मनोज जरांगे यांनी प्रस्तावित मराठवाडा दौराही रद्द केला आहे.

Continues below advertisement

कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे. 8 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या काळात त्यांनी सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात इशारा बैठका घेतल्या. तसेच या मार्गावरील गावागावातील लोकांशी संवाद साधला होता. दरम्यान, या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरी आणल्यावर त्यांची तब्बेत बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर अंतरवाली सराटीत  उपचार सुरु आहेत. 

अशक्तपणा आणि ताप आल्याने उपचार सुरु

मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा अशक्तपणा आणि ताप आल्याने अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या घरी त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तब्येत ठीक नसल्यामुळे मनोज जरांगे यांनी प्रस्तावित मराठवाडा दौराही रद्द केला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपवून आल्यानंतर उपचारासाठी जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. एका दिवसाच्या उपचारानंतर ते पुन्हा तात्पुता डिस्चार्ड घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास असणाऱ्या अभ्यासकांच्या बैठकीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. ही बैठक पार पडल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. त्यांना व्यवस्थित वाटू लगल्याने काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ड करण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा एकदा त्यांची तब्बेत बिघडली आहे. यानंतर तातडीने अंतरवाली सराटीत त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

दरम्यान, वारंवार उपोषणे करुन मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. डॉक्टरांनी त्यांना आमरण उपोषण न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील हे उपो,ण करण्यावर ठाम आेत. दरम्यान, मराठा आर७णाच्या संदर्भातील पुढील लढा 29 ऑगस्टपासून सुरु करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.