Manoj Jarange Patil :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांना सहाच महिन्याचा वेळ दिला होता. त्या माणसाने 58 लाख नोंदी  शोधल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी व्यक्त केले. तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही म्हणता आमचं नावच घेत नाहीत. त्यामुळं मी आता विखे पाटील आणि फडणवीस साहेबांचा जप सुरु केला आहे, तरीसुद्धा ते देत नाहीत असे जरांगे पाटील म्हणाले. 58 लाखातील नोंदी कमी करु नका, त्यातील एकही नोंद कमी करू नका, सध्या नोंदी कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तुम्ही पागलात काढायचं काम करू नका नाहीतर रस्ते बंद होतील असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला. 

Continues below advertisement

फडणवीस साहेब मी तुम्हाला टेंडन्सी दाखवतो पाठवा तुमचा माणूस

फडणीसांनी त्या दिवशी ताबडतोब प्रतिक्रिया दिली की अर्जाची अर्जाची टेंडन्सी नाही. मी तुम्हाला टेंडन्सी दाखवतो पाठवा तुमचा माणूस असे जरांगे म्हणाले. तुम्ही अंतरवालीत या आम्ही तुम्हाला उत्तर देतो, समोरासमोर मराठ्यांना कळू द्या, मराठे जी माहिती सांगत आहेत ती चुकीची आहे की सरकार सांगते ती माहिती चुकीची आहे. मराठ्यांना कळू द्या असे जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही म्हणतात ना सगळे व्यवस्थित चाललय. एक वर्षाचा काळ गेला 29 ऑगस्ट 2025 पासून आता 26 पर्यंत एकही नोंद, रेकॉर्ड समितीने शोधली नाही असे जरांगे म्हणाले. 

प्रश्न सोडल्याशिवाय मी हटत नाही

प्रश्न सोडल्याशिवाय मी हटत नाही, एकाच दिवसात तुकडा पाडणार असे जरांगे म्हणाले. मराठ्यांनी रस्ते जाम केले तर याला फडणवीस जबाबदार राहणार असल्याचे जरांगे म्हणाले. कॉकरोच पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपकेला धमकी आली आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धमक्याला भीत नसतात. मी थोबाड फोडत असतो लगेच. मी संत नाही, गरीब मराठ्यांचं कल्याण होतं म्हणून चुचकारीत चाललो. उद्या येतील परवा देतील म्हणून वाट बघतो. पण धमक्या दिल्या तर आम्ही जागेवर थोबाड फोडत असतो असे जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement

नोंदी कमी करण्याचा प्लॅन चालला आहे

फडणवीस  साहेब आणि विखे पाटील साहेब 58 लाख नोंदीतील एकही नोंद कमी करु नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुमचा नोंदी कमी करण्याचा प्लॅन चालला आहे. तुम्ही शिंदे समितीला चुकीची माहिती देऊन दबाव टाकू नका असेही पाटील म्हणाले.