Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यभरात वादळ उठवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 'आमरण उपोषणाचे' हत्यार उपसले आहे. येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो-करोडो मराठा बांधव सहभागी होणार असून, हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Continues below advertisement

Manoj Jarange Patil: 3 कोटी मराठे आंदोलनात सहभागी होणार: जरांगे पाटील

अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी आणि समर्थकांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहील. तीन कोटींपेक्षा जास्त मराठी आंदोलनात सहभागी होतील, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर सरकारला आता वेळ वाढवून दिला जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय याबाबत जाणून घेऊया...

Manoj Jarange Patil Demands: मनोज जरांगे यांच्या मागण्या काय?

1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.

Continues below advertisement

2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.

3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 

4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 

5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.

6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 

7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 

8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 

9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 

10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

Manoj jarange Patil on Devendra Fadnavis: जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

दरम्यान, समर्थकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की,  मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही प्रमाणपत्र का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीय सर्वेसर्वा आहे. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे. फडणवीस साहेब, या गोरगरिबांची मने जिंका. तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लावू देणार नाही. फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रासाठी रोखू नये. आंदोलनाच्या तारखेच्या आता प्रमाणपत्र द्या. 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे सर्व प्रमाणपत्र द्या. एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटले. तसेच फडणवीसांनी करावे. शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले तसे तुम्हीही घ्या, असे मनोज जरांगे म्हणाले. 

आणखी वाचा 

'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं