Jalna News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे पासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री येथे पुन्हा एकदा ओबीसींचा आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं ओबीसी आंदोलकांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

सरकारने मनोज जरांगे यांना पायघड्या टाकल्यास सरकारला ओबीसींच्या रोशाला समोर जावं लागेल

ओबीसी आंदोलक बळीराम खटके यांनी या प्रतिआंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने मनोज जरांगे यांना पायघड्या टाकल्यास सरकारला ओबीसींच्या रोशाला समोर जावं लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दोन दिवसात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे मत बळीराम खटके यांनी व्यक्त केले. 

30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होते. यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. आपल्याकडे रुपया नाही, पैशावाले आपल्यात येत नाहीत. मी प्रामाणिक आहे. आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे. मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली. मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का? म्हणून विचारतात. आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं