Jalna News : नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने लग्न मंडपात राडा झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. वधू आणि वर पक्षात मारामारी झाली आहे. 3 तारखेच्या लग्नातील राड्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील नांदी गावात ही घटना घडली आहे. नवरीच्या काकाने नवरदेवाच्या भावास ठोसा मारल्याने वाद विकोपाला गेला होता. दरम्या, या प्रकरणी वधू कडील 14 जणांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

नवरीच्या काकाने नवरदेवाच्या भावास ठोसा मारला 

लग्नात नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने झालेल्या वादाच रुपांतर हाणामारीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या नांदी गावात 3 तारखेला लग्न पार पडले.  या लग्नात नवरदेवाचा बूट नवरीकडील लोकांनी लपवला तर नवरीची चप्पल नवरदेवाच्या भावाने लपवली असता नवरीच्या काकाने नवरदेवाच्या भावास ठोसा मारला यातून दोघात वाद झाल्याने दोन्ही बाजूचे वऱ्हाड एकमेकांवर तुटून पडले, या नंतर प्रचंड वाद उफाळून आला यात नवरदेवाने हस्तक्षेप केला. मात्र, या राड्यात त्याचेही काही चालले नाही.  या प्रकरणी वधू कडील ज्ञात आणि अज्ञात 14 जणांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या राड्यात नवरदेवाकडील 7 आणि 15 ग्रॅम चे सोन्याचे दागिने देखील चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवरदेवाचे बूट लपवण्यावरुन हिंगोली जिल्ह्यातही लग्नात झाला होता राडा

हिंगोली जिल्ह्यातील कळमकोंडा गावात लग्नसोहळ्यात नवरदेवाचे बूट लपवण्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना गेल्या महिन्यातच घडली होती. किरकोळ वादातून वऱ्हाडी मंडळींनी चाकू हल्ला करत दोघांना जखमी केले होते. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनीही वऱ्हाडी मंडळींना चांगलाच चोप दिला होता. या घटनेमुळं शुभ मानल्या जाणाऱ्या लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला होता.

Continues below advertisement

कळमकोंडा गावात पातळे परिवार आणि वसमत तालुक्यातील गिरगाव येथील मेने परिवाराचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नानंतर बिदाईची तयारी सुरू असतानाच नवरदेवाचे बूट लपविण्यात आले. याच कारणावरून वऱ्हाडी मंडळी आणि गावातील तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत होताच काही वऱ्हाडी मंडळींनी गावातील तरुणांना मारहाण केली. त्यानंतर एका व्यक्तीने कमरेतील चाकू काढून गणेश डाळ याच्यावर सपासप वार केले. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या श्रावण गाढवे यांच्यावरही खंजीराने हल्ला करण्यात आला होता. 

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी ! पुण्यात भाजप नगरसेविकेमधला वाद चिघळला; अर्चना पाटलांसह पतीवरही ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल