Jalna Gunaratna Sadavarte News :  जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. गुणरत्न सदावर्ते आज जालना दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. 

Continues below advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना घेतलं ताब्यात 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षा चालकांच्या संदर्भात मराठी अमराठी यावादावर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यवार टीका केल्यानंतर जालन्यात मनसैनिक आक्रमक झाले होते. चंदनझिरा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं  आहे. 

शाईफेक प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंसह मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका

या घटनेनंतर सदावर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाईफेक प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.  राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करु.  वैचारिक चर्चेमध्ये तू हरलास तर तू उठबशा काढ आणि मी हरलो तर तर म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं खुळं आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. मी डंके की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. मनोज जरांगे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. यांचे जे काही संवेदनशील आणि अप-परवृत्तिचे विचार आहेत. लोकशाहीच्या विचारानं जी माणसं प्रेरित असतात ती अशा लोकांसमोर वाकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले नाही आणि टन टन टोलवाले सुद्धा नाही असं म्हणत शाही फेक केल्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Continues below advertisement