जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना; जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
पाण्याचा एक टिपूसही या धरणात दिसत नाही. या जमिनीवर पडलेल्या भेगा इंच इंच खोल गेल्या आहेत. जालन्यात परिस्थिती प्रचंड बिकट होऊ लागली आहे.

Jalna Drought: कोरड्या विहिरी, तळ गाठलेले जलस्रोत आता शेवटचे आचके मोजत आहेत. मराठवाड्यात गुरोढोरांची तहान भागवणं अशक्य होऊ लागलंय. उष्ण, तप्त वाऱ्यात आता वाळलेल्या पिकाचा आवाज येऊ लागलाय. शेतकऱ्यांच्या आशेने आता या कोरड्या विहिरींप्रमाणे तळ गाठला आहे. पावसाअभावी डोळ्यासमोरचं पीक गेलं. आता वर्षानुवर्ष वाढवलेली जनावरं कशी जगवायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जालना जिल्ह्यातलं गल्हाटी धरण अक्षरशः कोरडठाक पडलं आहे. पाण्याचा एक टिपूसही या धरणात दिसत नाही. या जमिनीवर पडलेल्या भेगा इंच इंच खोल गेल्या आहेत. जालन्यात परिस्थिती प्रचंड बिकट होऊ लागली आहे. (Jalna Drought)
जालन्यातील गल्हाटी धरण कोरडेठाक!
जालन्यात पाणीसाठ्याची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील 67 प्रकल्पांमध्ये केवळ 11.62 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असून, गेल्या आठवडाभरातच प्रकल्पांमधील पाणीसाठा दोन टक्क्यांनी कमी झाला आहे.उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता, पाण्याचा वापर आणि घट अशीच सुरू राहिल्यास हा साठा डिसेंबरपर्यंतच पुरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जालना जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठायला सुरवात केलीय , काही धरणे आताच कोरडी पडलीत.

अंबड तालुक्यातील कोरड्या पडलेल्या गल्हाटी धरणाच्या आजूबाजूच्या गावातील शेतकरी हतबल झाले आहेत. जनावरासाठी द्यायच्या सरक्याही जळून चालल्या आहेत. वावर ओस पडला आहे.प्यायला पाणी नाही. जनावराला पाणी नाही. पाण्या वाचून जनावरं मरायला लागले. असं रामनाथ माळी या शेतकऱ्यानं सांगितलं.

गल्हाटी धरण आटल्यामुळे शेतकरी गजानन घोडके म्हणाले ' गल्हाटी धरणात थेंबभरही पाणी शिल्लक नाही. या धरणाच्या आजूबाजूला असणाऱ्या सात-आठ -10 गावं या धरणावर अवलंबून आहेत. या धरणातील माशांवर व्यवसाय असणाऱ्या मच्छीमारांची लोकसंख्या पाच ते सहा हजार आहे. त्यांची परिस्थिती बिकट आहे. घरदार सोडून दुसरीकडे चालले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रचंड त्रास जाणवतोय. ज्यांच्याकडे बोअर आहे , त्यांच्याकडून सुद्धा एक एक इंचसुद्धा पाणी वर चढत नाही. सगळे शेतकरी तळमळायला लागले आहे. हळहळत आहेत. याची कोणीही दखल नंबर नाही. पिकाच फार नुकसान झालं आहे. तीन-चार जोड्या आल्या त्याही जळून जात आहेत. असे शेतकऱ्यांने सांगितले.

Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
महत्त्वाच्या बातम्या





















