Jalna Accident News :  जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव कार विहिरीमध्ये कोसळल्याची घटना पारध ते वालसावंगी रस्त्यावर घडली आहे. यामध्ये विहिरीत बुडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. कार मध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

जालना जिल्ह्यातील पारध ते वालसावंगी मार्गावरील पद्मावती गावाजवळ घडली घटना

जालना जिल्ह्यातील पारध ते वालसावंगी मार्गावरील पद्मावती गावाजवळ भरधाव कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा विहिरीतील पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेला नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दुसऱ्या महिलेचा ही मृत्यू झाला. 

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली 

सुलतानबी खान आणि अख्तर बेगम अमन खान असे मयत महिलांची नावे आहेत. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील एकाच कुटुंबातील तीन जन अंत्यविधी आटोपून परत येत होते. त्यावेळी पद्मावती गावाजवळ एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून ही कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Continues below advertisement

जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू

जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या मलब्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर चौघेजण जखमी झाले आहेत. भोकरदन शहरातील अन्वा रोडवरील महाविद्यालयाचा सायंकाळी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर भोकरदन आणि जालना येथे उपचार सुरू असल्याची देखील माहिती आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजकुवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यावेळी अनेक मजूर काम करत होते. स्लॅबच्या मलब्याखाली काही मजूर अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बांधकामावरील इतर कामगार आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत मलब्याखाली अडकलेल्या मजुरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले. या दुर्घटनेत मोतीलाल रामजी मिरगे (वय 50, रा. मुठाड, ता. भोकरदन) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा नामदेव हिरे (वय 30, रा. दगडवाडी), कृष्णा विठ्ठल शिंदे (वय 40, रा. वाकडी), फारुख खा शारूख खा (वय 38, रा. दानापूर) आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे (वय 30, रा. सुरंगळी) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .