जालना: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जावणत असून मराठवाड्यात पेट्रोल (Petrol) पंपाबाहेर ड्रम घेऊन ग्राहकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळाल. मात्र, जालन्यातील (Jalna) वाटूर फाटा येथे डिझेल भरण्यावरून चक्क पेट्रोल पंपावरच हाणामारीची घटना घडली, काल सोमवारी रात्री झालेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन हजार रुपयांचे डिझेल का टाकत नाही म्हणत पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे, मारहाणीनंतर पेट्रोल पंपाला आग लावल्याची धमकी देणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

राज्यात एकीकडे इंधनाचा कुठलाही तुटवडा नसून पेट्रोल पंपावर सुरळीत पेट्रोल-डिझेलचा साठा असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे चक्क मारहाणीच्या घटना पेट्रोल पंपावर घडतानाचे विदारक वास्तव आहे. जालन्यातील वाटुर फाटा येथे डिझेल भरण्याच्या कारणावरून हाणामारीची घटना घडल्याचं समोर आलाय, रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन रांगेत न लावता दोन हजार रुपयाचे डिझेल भरण्याची मागणी करत पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी, संशयित आरोपीने पेट्रोल पंप माचिसने जाळण्याची धमकी दिल्याचंदेखील तक्रारीत म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीतून जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पेट्रोल डिझेलचा साठा कोण करतंय, याची चौकशी करा. राज्यात सध्या नेहमीपेक्षा 52 टक्के जास्तीची इंधन खरेदी होत आहे, हे 52 टक्के इंधन खरेदी कोण करतंय याचा शोध घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यात सध्या पुरेसा इंधनासाठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून देण्यात आली. मात्र, अफवेमुळे 52 टक्के इंधन खरेदी अधिकची वाढल्यानं अडचण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधू दंडवते यांचं नाव देणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय