Jalna: ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत आले आहेत. या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले . सांगली, अहिल्यानगर, भंडारा, उल्हासनगर ,जालन्यात मोठ्या संख्येने ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरला होता. पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी जनआक्रोश मोर्चे होत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बहुजन वंचित आघाडी आक्रमक झाली आहे . 'पडळकर मराठवाड्यात आल्यास तोंडाला काळे फासणार. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फिरू देणार नाही ' असा पवित्रा जालन्यातील वंचित बहुजन आघाडीने घेतलाय .
पडळकरांविरोधात संपूर्ण मराठवाड्यात आंदोलने उभारू
'मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा जालना जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र ख्रिश्चन सेना संघटनेचे अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी 'Abp माझा 'शी बोलताना दिला . एखादा सत्तेत असणारा आमदार जर तुम्ही खून केला तर अकरा लाखाचं बक्षीस देतो असं म्हणत आहे .हे म्हणजे सुपारी देऊन किलिंग करण्यासारखे . हा अत्यंत मोठा गुन्हा आहे .त्यामुळे शासनाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी .त्यांचे आमदारकी रद्द करावी अशी मागणीही बहुजन वंचित आघाडीने केलीय. 11 जुलैला पडळकर यांच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचंही ते म्हणाले.
तोंडाला काळे फासू... वंचित बहुजन आक्रमक
'भाजप आमदार गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासू . महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लोकशाही पद्धतीने फिरणं मुश्किल करून टाकू . 'असा इशारा वंचित बहुजन कडून दिला जातोय .केवळ मोर्चा पुरताच हे मर्यादित नाही .रास्ता रोको, निदर्शनं तसेच जे जे शक्य मार्ग असतील ते आम्ही वापरू असंही सांगण्यात आलंय . सांगलीतील ऋतुजा या गर्भवती महिलेच्या आत्महत्या प्रकरणात आत्महत्या ही दुर्दैवीच .पण केवळ ते हिंदू होती म्हणून आत्महत्या केली .आणि सासरचे ख्रिश्चन होते म्हणून त्यांनी आत्महत्येला प्रवृत्त केलं ही भूमिका जातीमध्ये तेढ निर्माण करणारी आहे .असा आरोप होतोय .
शासनाचे ख्रिश्चन बांधवांच्या मोर्चांकडे दुर्लक्ष
आमदार गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी जाती-जातीत तेढ निर्माण करण्यासाठी वापरत आहेत .त्यामुळे शासनाने त्यांचे आमदारकी रद्द करावी अशी मागणी ही बहुजन वंचितकडून करण्यात येत आहे . जालनात काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत जन आक्रोश मोर्चा काढला होता .या मोर्चात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करावी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारच्या काही मागण्या होत्या .तरीही याबाबत काहीही कारवाई झाली नाही . केवळ जालन्यातच नाही तर सांगली, अहिल्यानगर, भंडारा, ठाण्यासह राज्यभर ख्रिस्ती समाजाची होणारी आंदोलन शासनाने गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला . ख्रिश्चन समाज हा सरकारचा मतदार नसल्याने त्यांची काळजी का घ्यायची असा अविर्भावाने शासन पडळकर यांना विरोधात कारवाई करत नसावं अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली .जर महाराष्ट्र शासन पडळकर यांवर कारवाई करणार नसेल तर बहुजन वंचित आघाडी तुम्हाला कायदा काय असतो ते दाखवून देईल असा इशारा वंचितचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला .
हेही वाचा