Rohini Khadse News : महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड लेखी परीक्षेतएक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. आपल्या राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासन कसा खेळ करतंय पहा अस रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दरवर्षी मोठ्या संख्येनं विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात. या परीक्षांची त्यांनी तयारी देखील केली असेत. मात्र, अचानक अशी बातमी आल्यामुळं खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आले

महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेचा पेपर नुकताच पार पडला. मात्र, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे कुठल्याही अधिकाऱ्यांनी तयार केलेले नव्हते. या संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील प्रश्न होते. 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आले होते म्हणजे 85 टक्के प्रश्न हे याच पुस्तकातून आले होते. 

Continues below advertisement

प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर

पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या विभागात भरती प्रक्रियेसाठी स्वतः तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नसंच काढणे अपेक्षित आहे. पण एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रश्न उचलले जात असतील तर यातून प्रशासनाचा हलगर्जीपणा तर समोर येत असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या. पारदर्शकतेवरही प्रश्न निर्माण होतोय अशी टीका त्यांनी केली. यात नक्कीच एखादा अधिकारी या खासगी प्रकाशनाशी संबंधित असेल. त्यामुळे याची तातडीने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. 3977 मुलांनी ही परीक्षा दिली आहे. अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरु मुलांच्या स्वप्नांवर कोण नांगर फिरवत असेल तर त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे असंही त्या म्हणाल्या .

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?