Jalgaon : राज्यातील अनेक भागात इंधनाचा तुटवडा भासत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात देखील काही भागात इंधनाचा तुटवडा भासत आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्ष आक्रमक झाला आहे. पुढील 24 तासात सरकारने शेतकऱ्यांसाठी 25 टक्के पेट्रोल पंप राखीव न केल्यास, कोणतेही सरकारी वाहन रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज जळगावमध्ये देण्यात आला आहे.
तातडीने शेतकऱ्यांसाठी सरकारने डिझेल पंप राखीव करावेत
सध्या पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने, शेतकऱ्यांच्या शेत जमिनी तयार करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या पंधरा दिवसात जर शेतकऱ्यांच्या जमिनी तयार होऊ शकल्या नाहीत तर पेरण्या करण्यास अडचणी निर्माण होऊन, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळं तातडीने शेतकऱ्यांसाठी सरकारने डिझेल पंप राखीव करण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, सरकारने असा निर्णय घेतला नाही तर मात्र कोणतेही वाहन रस्त्यावर फिरू देणार नाही,असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
जालना जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शासकीय सेवेतील वाहनांसाठी साठा राखीव ठेवण्याचे आदेश
इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना 5 टक्के इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि शासकीय सेवेतील वाहनांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनर मध्ये पेट्रोल डिझेल देण्यास बंदी
इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेत सर्व पेट्रोल पंपांना पाच टक्के इंधनसाठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवा तसेच शासकी वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकारी अशीमा मित्र यांनी आदेश काढलेत. तसेच या आदेशात पेट्रोल पंपावर कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनर मध्ये पेट्रोल डिझेल देण्यास देखील बंदी घातली आहे, या संदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती नागरिकांची डिझेल खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे त्या पार्श्वभूमी जालना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या: