Jalgaon News :  जळगाव महानगरपालिकेच्या (Jalgaon Mahapalika) महासभेत एसी बंद असल्याने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना प्रचंड उकाड्याचा सामनाकरावा लागला. महासभेतून काही ज्येष्ठ नगरसेविक सभागृहातून होत असलेल्या उकाड्यामुळे निघून गेल्यानंतर नगरसेवक आक्रमक झाले. जळगावचे तापमान 45 अंशांवर पोहोचले असताना सभागृहातील एसी अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे रुमाल, फाईलने (कागदपत्रांनी) हवा घेण्याची वेळ अधिकारी आणि नगरसेवकांवर आली होती. 

Continues below advertisement

सभागृहात किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि एसी तातडीने दुरुस्त करावेत, नगसेवकांची मागणी

सभागृहात किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि एसी तातडीने दुरुस्त करावे किंवा सभागृहात किमान पंख्यांची कुलरची सोय करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, महापौर, उपमहापौर आणि आयुक्त बसलेल्या व्यासपीठावर मात्र एसी व पंख्यांची व्यवस्था असल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केली जाते.

राज्यातील तापमानाचा पारा वाढला

सध्या राज्यातील तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशावर गेला आहे.अशातच जळगाव महापालिकेत एसी बंद असल्याने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचे हाल झाल्याचं पाहायला मिळालं. सभागृहातील प्रचंड उकाड्यामुळे काही जेष्ठ नगरसेवक महासभा अर्धवट सोडून निघून गेले.  महासभा सुरू असताना रुमाल, फाईलने (कागदपत्रांनी) हवा घेण्याची वेळ अधिकारी आणि नगरसेवकांवर आली होती. दरम्यान, दुसऱ्या बाजुला महापौर, उपमहापौर आणि आयुक्त बसलेल्या व्यासपीठावर मात्र एसी व पंख्यांची व्यवस्था करण्यात आली होती. 

Continues below advertisement

सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे असून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.  पुढील तीन ते चार दिवसांत तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात पुढील चार दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.(Pune IMD News)

महत्वाच्या बातम्या:

Pune IMD News: पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा