Jalgaon : सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हुंड्यासाठी हा बळी गेल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. पुन्हा अशा प्रकारे कोणत्याही वैष्णवीचा बळी जाऊ नये यासाठी जळगाव जिल्ह्यातील मंगळगृह मंदिर संस्थान पुढे आले आहे. वड पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शेकडो भाविकांनी हुंडा देणार नाही, घेणार नाही, कुटुंब व्यवस्था मोडणार नाही अशा प्रकारची शपथ घेतली आहे. 

साध्या पद्धतीने विवाह तसेच कौटुंबिक हिंसाचार न करण्याची घेतली शपथ

एखाद्या तीर्थक्षेत्रावर अशा पद्धतीने सामूहिक शपथ कार्यक्रम घेणारं मंगळग्रह मंदिर हे राज्यातलं पहिले तीर्थक्षेत्र असल्याचा दावा संस्थांचे विश्वस्त दिगंबर महाले यांनी केला आहेपुण्यातील वैष्णवी हगवणे घटनेनंतर समाजात जागृती व्हावे, यासाठी अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिर संस्थांननी पुढाकार घेतला असून त्याच पार्श्वभूमीवर सामूहिक शपथेचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. हुंडा घेणार नाही आणि देणार नाही. लग्न समारंभातील अतिरिक्त खर्च यासह चुकीच्या प्रथा मोडून साध्या पद्धतीने विवाह तसेच कौटुंबिक हिंसाचार न करण्याची शपथ यावेळी उपस्थित भाविकांनी घेतली. वैष्णवी हगवणे सारखी घटना राज्यात पुन्हा कुठल्याही तरुणीसोबत घडू नये हाच या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं विश्वस्त दिगंबर महाले म्हणाले. तसेच पुढील काळात मंगळ ग्रह मंदिरावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अशा पद्धतीची शपथ दिली जाईल अशी माहिती दिगंबर महाले यांनी दिली. 

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा, सासरे राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. आता आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून (Postmortem Report) समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सासरच्या मंडळींना अटक केली आहे. अधिकचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, असा घटना घडून नये म्हणून विविध सामाजित संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. हुंडाबंदी करण्यात यावी असी मागणी देखील केी जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Vaishnavi Hagawane Death Case : मोठी बातमी : वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी माहिती उघड, मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे, हगवणेंची खाती गोठवली, कोठडी वाढवली!