Jalgaon Municipal Corporation Election 2026 जळगाव: राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. जळगावसह राज्यातील एकूण 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. खान्देशातील सर्वात मोठ्या जळगाव महापालिकेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे. जळगाव महानगरपालिकेच्यानिवडणुकीत एकूण 19 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. (JalgaonMuncipal Election Marathi News)
जळगाव महापालिकेचा इतिहास- (Jalgaon Municipal Corporation Election 2025)
जळगाव महानगरपालिका ही राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव शहराची स्थानिक शहरी प्रशासकीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना 21 मार्च 2003 रोजी झाली.जळगाव शहराचा इतिहास खानदेश प्रदेशाशी जोडलेला आहे. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर श्रीमती आशा दिलीप कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला, तर अब्दुल करीम सालार हे पहिले उपमहापौर झाले. मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुहूर्त लागला आहे. जळगावमहानगरपालिकेचे क्षेत्रफळ अंदाजे 68.78 चौरस किलोमीटर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे 4.60 लाख आहे. या संस्थेचे मुख्यालय हे जळगाव शहरातच आहे. ही संस्था शहरातील नागरी सुविधा, बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्यइत्यादीसेवापुरवते. या महापालिकेला आता 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.
2018 च्या निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे-
राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जळगाव महापालिकेअंतर्गत एकूण 19 प्रभाग असून 75 नगरसेवकांची निवड या निवडणुकीतून होणार आहे. 15 जानेवारी 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर 16 जानेवारी 2025 रोजी निकाल लागेल. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडूनयानिवडणुकीसाठीतयारीकरण्यातआलीये. जळगाव महानगरपालिकेच्या शेवटच्या निवडणुका 2018 मध्ये झाल्या होत्या, ज्यात एकूण 75 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 57 जागा जिंकून आपला विजय मिळवला होता. जळगावात गेली 40 वर्षांपासून शिवसेनेच्या सुरेश जैन यांची याच ठिकाणी सत्ता होती. पण भाजपने आपली ताकद लावून 2018 मध्ये एकहाती विजय मिळवला होता
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा आरक्षण कसं असेल?
जळगाव महानगरपालिकेने (JMC) 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी प्रारूप आरक्षण यादी जाहीर केली आहे. त्यापैकी 18 प्रभागांमध्ये चार सदस्यांची व्यवस्था आहे, तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये तीन सदस्य असतील. जळगावमध्ये एकूण 38 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमातीसाठी 2, ओबीसीसाठी 10 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 जागा आहेत. जळगाव महानगरपालिकेमधील एकूण आरक्षणात अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4, ओबीसीसाठी 20 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी46 जागा आहेत.
जळगाव महापालिकेवर यंदा कमळ फुलणार? शिवसेनेचा झेंडा?
राज्यातील महापालिका निवडणुकांध्ये (Election) उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत आहे. जळगाव (Jalgaon) मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक 18 अ मधील उमेदवार तथा आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली. कारण, येथील गौरव सोनवणेंच्या विरोधातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहे. राज्याचे भाजपचे 6 उमेदवार विजयी झाल्यानंतर आता जळगावत शिवसेना शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी झाल्याने महायुतीचे राज्यात 7 उमेदवार बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, शिंदेंच्याशिवसेनेनं (Shivsena) आज खातं उघडलं आहे.
जळगावमहानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (Jalgaon Election Date 2026)
- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
- उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
- मतदान- 15 जानेवारी 2026
- मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
2018 चेपक्षीय बलाबल (Party Wise Corporator Jalgaon 2018)
भाजप (BJP): 57 जागा
शिवसेना (Shiv Sena): 15 जागा
AIMIM: 3 जागा
काँग्रेस (Congress): 0 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP): 0 जागा
जळगावात महायुतीची घोषणा
जळगावात काही दिवसापूसन युती होणार असल्याची चर्चा होती. अखेर जळगावातमहायुतीची घोषणा झाली आहे. भाजप 46, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 6, शिवसेना (शिंदे गट) 23 जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवारांची आयात-निर्यात करण्यात आली आहे. उमेदवारीवरून भाजपात नाराजी असून ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
भाजपा आणि शिंदेसेनेचे 12 उमेदवार बिनविरोध विजयी
अनेक वर्षांनंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून 29 महापालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे, यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. अर्ज माघारी घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी गोंधळ बघायला मिळाला. जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेचे 12 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात भाजपाचे 6, शिंदे सेनेच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी (१ जानेवारी) भाजपाचा एक, तर शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यात शुक्रवारी म्हणजे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भर पडली.
भाजपा-शिंदेसेनेचे कोणते उमेदवार विजयी झाले? एकूण - 12 शिंदेसेना - 6 भाजपा -6 बिनविरोध विजय
- उज्ज्वला बेंडाळे, भाजपा
- दीपमाला काळे, भाजपा
- विशाल भोळे, भाजपा
- विरेन खडके, भाजपा
- अंकिता पंकज पाटील, भाजपा
- वैशाली अमित पाटील, भाजपा
- गौरव सोनवणे, शिंदेसेना
- सागर सोनवणे, शिंदेसेना
- गणेश सोनवणे, शिंदेसेना
- रेखा पाटील, शिंदेसेना
- मनोज चौधरी, शिंदेसेना
- प्रतिभा देशमुख, शिंदेसेना
हेही वाचा>>>
