Jalgaon Accident News :  जळगाव जिल्ह्यात भीषण अपघातझाल्याची घटना घडली आहे. हा अपघात चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर घडला आहे. यामध्ये हिरापूर गावातील सख्ख्या दोन भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आयशरने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळं गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा जळगाव–चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे. 

संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधकांच्या मागणीसाठी आंदोलन केलं

चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. यामध्ये दोन भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधकांच्या मागणीसाठी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये सख्ख्या दोन भावांचा समावेश आहे. या घटनेमुळे हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. 

अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी जळगाव-चांदवड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर तात्काळ गतिरोधक टाकण्याच्या मागणीवर गावकरी ठाम असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, या अपघाताच्या घटनेनंतर नागरिक संतप्त धाल्याचे पाहायला मिळाले. संतप्त झालेल्या नागरिकांना थेट रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालं. यामुळं मोठ्या प्रमाणात चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त ग्रामस्थांनी गतिरोधकांच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच वेळी दोन सख्ख्या भावांचा आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला अचानक आग

कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. धूर येत असल्याचे समजल्यानंतर लेगच चालकाने प्रसंगावधान साधत बाईक बाजूला घेतली. त्यानंतर काही वेळाने गाडीने पेट घेतला. दरम्यान, ही घटना उचगाव नजीकच्या मार्गावर घडली आहे. दरम्यान, या घटनेत  गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.निवास यमगर असं दुचाकीच्या मालकाच नाव आहे.  या घटनेनंतर महामार्गावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! अकोल्यात  407 वाहनाचा भीषण अपघात, दोन शेतमजूर जागीच ठार, 11 जण जखमी, चार जणांची प्रकृती चिंताजनक