Girish Mahajan on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचया मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या 14 दिवसापासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. अशातच आता त्यांनी मुंबईला जाण्याचा इशारा दिला आहे. आझाद मैदानावरच आमरण उपोषण होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेसंदर्भात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन मार्ग निघणार नाही. आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत राहून चर्चा करावी असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसापासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. अद्याप आरक्षणाच्या संदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही. याबबत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही वारंवार त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या 14 पैकी 12 मागण्या सरकारने सनदशीर मार्गाने मान्य केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक सवलती, ओबीसींप्रमाणे सर्व लाभ सरकारने दिले आहेत. पण कोर्टाच्या आदेशाबाहेर जाऊन 'सगेसोयरे' किंवा 'जात पडताळणी समितीच रद्द करा' अशा अवास्तव मागण्या कशा पूर्ण होणार? असास सवाल गिरीश महाजन यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन मार्ग निघणार नाही. आंदोलकांनी कायद्याच्या चौकटीत राहून चर्चा करावी असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
प्रसिद्धीसाठी बोलायचं, मनात येईल ते बरळायचं ही संजय राऊतांची जुनी सवय
संजय राऊतांना प्रत्येकाचा मर्डर करण्याचा कट दिसतो! स्वतःला मारण्याचा कटही त्यांनी आधी बोलून दाखवला होता. ते अजून जिवंत आहेत ना? काहीतरी प्रसिद्धीसाठी बोलायचं, मनात येईल ते बरळायचं, ही त्यांची जुनी सवय आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर केली.
एमपीएसी पेपरफुटी प्रकरण! काही नालायक लोकांनी पैशांच्या हव्यासापोटी हा गैरप्रकार केला
एमपीएसी पेपरफुटी प्रकरणा संदर्भात बोलताना महाजन म्हणाले की, सरकार कुठेही अपयशी ठरलेलं नाही. काही नालायक लोकांनी पैशांच्या हव्यासापोटी हा गैरप्रकार केला आहे. त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पेपर छपाईपासून ते वितरणापर्यंत अनेक लोकांच्या हातातून जातो. केंद्र आणि राज्य सरकारने पेपरफुटीविरोधात अतिशय कडक कायदे केले आहेत. विद्यार्थ्यांचा राग स्वाभाविक आहे; मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी सावध राहावं, काही मंडळी या आंदोलनात स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परीक्षा पारदर्शक व्हाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे असे महाजन म्हणाले.
