Erandol Vidhan Sabha Constituency : ज्या निवडणुकीची सर्वात जास्त चर्चा सुरूय. ती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024)  रणधुमाळी सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात निवडणुकांचा शंखनाद फुंकण्यात आला असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे, कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघाची (Erandol Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे.  महाराष्ट्रातील एरंडोल विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 16 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून अमोल पाटील, डॉ सतीश पाटील, हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील, एटी नाना पाटील, अमित पाटील यांच्यात बहुरंगी लढत होत आहे. यंदाची निवडणूक अत्यंत रंजक असणार आहे, तितकाच निकालही अधिक रंजक असणार आहेत. 


एरंडोल विधानसभा मतदारसंघात पुन्हा पाटलांचीच जादू चालणार का?


एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील (Amol Patil) यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) डॉ सतीश पाटील (Satish Patil) रिंगणात असतील. तर या निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख हर्षल माने (Harshal Mane), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संभाजी पाटील (Sambhaji Patil), भाजपाचे माजी खासदार ए टी पाटील (A T Patil) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित पाटील (Amit Patil) हे अपक्ष म्हणून लढणार आहेत. एरंडोल जागेवर प्रदीर्घ काळापासून पाटील आडनावाचेच वर्चस्व आहे. या जागेवरून सध्या शिवसेनेचे चिमणराव पाटील आमदार आहेत. यापूर्वी ही जागा राष्ट्रवादीचे अण्णासाहेब डॉ. सतीश भास्करराव पाटील यांच्याकडे होती. त्यांच्या आधीही ही जागा शिवसेनेच्या गुलाब रघुनाथ पाटील यांच्याकडे होती. गुलाब रघुनाथ पाटील यांनी 1999 आणि 2004 मध्ये ही जागा जिंकली होती.


2019 च्या निवडणुकीत काय झाले?


2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, निवडणुकीत शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी एरंडोल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अण्णासाहेब डॉ.सतीश भास्करराव पाटील हे रिंगणात होते. या निवडणुकीत चिमणरावांना एकूण 82650 मते मिळाली तर त्यांचे निकटवर्तीय डॉ.सतीश यांना 64648 मते मिळाली होती. याशिवाय अपक्ष उमेदवार शिरोळे गोविंद एकनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना या निवडणुकीत 24587 मते मिळाली. शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे डॉ. सतीश यांचा 18002 मतांनी पराभव केला होता.


महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा कोणाच्या हाती जाणार?


महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्यासाठी 145 जागांचे बहुमत आवश्यक आहे. एरंडोल (Erandol) ही महाराष्ट्रातील 16 वी विधानसभेचा मतदारसंघ आहे. या जागेवर सध्या शिवसेनेचे चिमणराव पाटील पाटील हे विद्यमान आमदार आहेत.