Jalgaon : आज राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या दरम्यान, काही ठिकाणी गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथे मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदारांना कमळाचे बटण दाबा असे सांगत असल्याच्या संशय वरुन काही जणांनी आक्षेप घेतल्याचा प्रकार घडला आहे. यामुळं मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील प्रभाग क्रमांक दहा मधील बूथ क्रमांक पाच सहा वरती राडा गोंधळ झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.
मतदारांना कमळाचे बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचे विरोधकांचे म्हणणे
वरणगाव नगरपालिकेची निवडणुसाठी मतदान सुरु असताना, प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धेश्वर नगर येथील बुथ क्रमांक वरती हा गोधळ झाला आहे. बुथ क्रमांकावरील जावळे नामक अधिकारी हा मतदारांना कमळाचे बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळं काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी आणि माजी नगराध्यक्ष व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी या बुथवरती भेट देत त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी लावून धरली. यावेळी पोलीस आणि निवडणूक अधिकारी आणि उमेदवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लांबणीवर
राज्यातील नगरपरिषद (Nagarparishad) आणि नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagarpanchyat Election) निकालाबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत (Nagarparishad Election Result) न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे गेल्यामुळे प्रशासनाचा ताण तर वाढलाच आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर