ISRO Launched PSLV C61 Rocket:  इस्रोने आज (18 मे 2025) सकाळी 5.59 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लाँच पॅड (FLP) वरून PSLV-C61 रॉकेटचे प्रक्षेपण केले. मात्र त्यात त्याला अपयश आल्याची माहिती समोर आली आहे. पीएसएलव्ही (PSLV-C61) हे रॉकेट त्याचा तिसरा टप्पा ओलांडू शकला नाही. इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी ही माहिती दिली आहे. हा उपग्रह EOS-04 सारखाच होता आणि त्याचे काम पृथ्वीचे फोटो आणि माहिती पाठवणे होते, जेणेकरून महत्त्वाच्या कामांसाठी डेटा मिळवता येईल. मुख्य बाब म्हणजे, या रॉकेटच्या मदतीने सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार होतं.

या रॉकेटने EOS-09 ला सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिट (Sun Synchronous Polar Orbit - SSPO) मध्ये नेले. 'सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार' ने सुसज्ज, EOS-09 कोणत्याही हवामान परिस्थितीत कधीही पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेण्यास सक्षम असेल. मात्र इस्रोच्या या 101वं अभियानाला अपयश आल्याने अनेकांची काहीशी निराशा झाली आहे. 

PSLV-C61 रॉकेटचा काय असेल फायदा?

देशाच्या रडार सेन्सिंग क्षमतांना अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने EOS-09 उपग्रहाची रचना करण्यात आली आहे. हे दहशतवादविरोधी कारवाया, घुसखोरी किंवा संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी डिझाइन केले होते आणि त्याच्या मदतीने शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर या रॉकेटने  लक्ष ठेवलं असतं. त्याचे वजन अंदाजे 1, 710 किलोग्रॅम होते आणि त्यामुळे देशाला आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय देखरेख यासारख्या क्षेत्रातही अचूक माहिती मिळण्यास मदत झाली असती.

भारतीय शास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यू. सेल्वमूर्ती नेमकं काय म्हणाले?

इस्रोने केलेल्या EOS-09 (पृथ्वी निरीक्षण उपग्रह-09) च्या प्रक्षेपणप्रसंगी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यू. सेल्वमूर्ती यांनी काल त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "हा उपग्रह खूप खास आहे कारण तो अशा अनेक उपग्रहांचा भाग आहे, जे पृथ्वीवर लक्ष ठेवतात आणि कोणते बदल होत आहेत हे शोधतात. हा उपग्रह शेती, वन, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा यासारख्या कामांमध्ये मदत करेल. देशाच्या सीमांवर लक्ष ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे."

इतर महत्वाच्या बातम्या