Iran vs Israel War: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे (Iran vs Israel War) पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. याचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसत आहेत. या युद्धामुळे खनिज तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दैनंदिन व्यवहारातील सर्वच गोष्टींवर होऊ शकतो. तसेच भारताचा भांडवली बाजार आणि अर्थव्यवस्थेला या युद्धाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यातील हे युद्ध आणखी किती काळ चालणार, हा प्रश्न अनेक भारतीयांना पडला आहे. याबाबत भारतीय लष्करातील माजी कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन (Abhay Patwardhan) यांनी एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.

Continues below advertisement

Iran vs Israel War: रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली

संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांच्या अंदाजानुसार, इराण आणि अमेरिकेचा संघर्ष किमान एक महिना आणखी चालू शकतो. कारण इराणकडील क्षेपणास्त्रांचा साठा तसेच त्यांचा मारा करण्याची इराणची क्षमता सध्या संपलेली नाही, असा अंदाज संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर रशियाने जानेवारी महिन्यात मिसाईलचा मोठा पुरवठा इराणला केला असल्याने इराणची मिसाईल संदर्भातली क्षमता वाढलेली असल्याकडेही अभय पटवर्धन यांनी लक्ष वेधले. 

Iran vs Israel War: ...तर ट्रम्प प्रशासनाची अमेरिकेतील स्थिती कमकुवत होईल

दरम्यान, अमेरिकन सिनेटमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या युद्धासंबंधीच्या अधिकारांना कात्री लावणारा विधेयक पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पची मनमानी आणखी वाढेल आणि त्याचे परिणाम येणाऱ्या दिवसात या युद्धात दिसून येईल असं ही अभय पटवर्धन म्हणाले. हिंदी महासागरात इराणची युद्धनौका अमेरिकेने बुडवली असली, तरी युद्ध भारतीय उपखंडापर्यंत पोहोचला आहे, असं निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र, अमेरिकेच्या अनेक युद्धनौका सध्या अरबी समुद्र आणि हिंद महासागरात विविध ठिकाणी आहेत. जर इराणने त्यांच्यावर मारा केला आणि अमेरिकेचे मोठे नुकसान झाले तर ट्रम्प प्रशासनाची अमेरिकेतील स्थिती कमकुवत होईल, याकडेही अभय पटवर्धन यांनी लक्ष वेधले.

Continues below advertisement

इतर महत्त्वाच्या बातम्या

Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!

Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?