अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!
Continues below advertisement
नवी दिल्ली : पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताच्या प्रवेशद्वारातून मान्सूनने आगमन केलं आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे.
काही तासातच मान्सून देवभूमी अर्थातच केरळमध्ये वर्दी देईल, असा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरला.
केरळमध्ये पाऊस येण्यास पोषक वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती पाहता आजच मान्सून केरळमध्ये दाखल झाला.
मान्सून आज केरळच्या समुद्रकिनारी पोहोचेल आणि पुढील 24 तासात केरळच्या बहुतांश भागात तसंच तामिळनाडूमध्ये दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागार परिसरात होईल.
दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सून वेगाने दाखल होईल अशी चिन्हं आहेत. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. शिवाय यावर्षी राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस होईल, असंही साबळे यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
मान्सूनचं काऊंटडाऊन सुरु, काही तासात केरळात!
येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार
”मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज”
मान्सून 30 मे रोजी केरळात!
आनंदाची बातमी! मान्सून अंदमानमध्ये दाखल
येत्या 72 तासात मान्सून अंदमानात!
राज्यात मान्सून यंदा वेळेवर, येत्या पाच दिवसात अंदमानात!
Continues below advertisement