India Pakistan Ceasefire:'युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच, अफवांकडे लक्ष देऊ नका...', भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर लष्कराची स्पष्टोक्ती
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी आज संपुष्टात येणार असल्याच्या अफवांवर भारतीय लष्कराने भाष्य करत हा दावा फेटाळून लावलाय. यासोबतच आज DGMO स्तरावरील चर्चेबाबतही लष्कराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी आज संपुष्टात येणार असल्याचे वृत्त काही समाज माध्यामांवरून प्रसारित केल्या जात आहे. दरम्यान बाबतीत आता स्वत: भारतीय लष्कराने स्पष्टोक्ती देत हा दावा फेटाळून लावला आहे आहेत. यासोबतच, आज डीजीएमओ (DGMO) स्तरावरील चर्चेबाबतही लष्कराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
डीजीएमओंमध्ये बैठकसंदर्भात भारतीय लष्कराची स्पष्टोक्ती
भारतीय लष्कराने या बाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, "आज डीजीएमओ स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नाही. 12 मे रोजी डीजीएमओ (DGMO) चर्चेत ठरल्याप्रमाणे युद्धबंदी सुरू ठेवण्याबाबत बोलायचे झाल्यास त्याची कोणतीही कालबाह्यता तारीख नाही." युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच आहे. त्यामुळे अफवांकडे लक्ष देऊ नका. असे आवाहनही भारतीय लष्कराकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तान सातत्याने भारतीय शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत होता, ज्याला भारतीय सैन्यही चोख प्रत्युत्तर देत होते. 10 मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करारावर स्वाक्षरी झाली, त्यानंतर 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये बैठक झाली, ज्यामध्ये युद्धबंदीबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
युद्धबंदीनंतरही पाकिस्तानने केला हल्ला
भारत पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी झालेल्या युद्धबंदीच्या अवघ्या चार तासांनंतर पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांवर हल्ला केला. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली. यापूर्वी, भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईबाबत एक मोठा निर्णय घेतला होता. भविष्यात कोणतीही दहशतवादी घटना भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल, असा कडक संदेश सरकारने दिला. जर पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले गेले तर भविष्यात कोणतीही चर्चा होणार नाही, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.
Some media houses are reporting that the ceasefire between India and Pakistan is ending today. In addition, queries are also being received if a DGMO-level talk is scheduled today.
— ANI (@ANI) May 18, 2025
According to the Indian Army, no DGMO talks are scheduled today. As far as the continuation of a…
भारतीय लष्करी नवी रणनीती
भारत आता पारंपारिक युद्धाच्या पलीकडे जात आहे आणि स्टँड-ऑफ शस्त्रे, प्रीडेटर ड्रोन आणि स्वदेशी कमी किमतीच्या स्वार्म ड्रोनवर लक्ष केंद्रित करत आहे. 2028 पर्यंत, 31 अमेरिकन प्रीडेटर ड्रोन भारतीय सैन्यात सामील होतील, ज्यामुळे भारताची देखरेख आणि प्रतिसाद क्षमता आणखी वाढेल.चीन आणि तुर्कीकडून पाठिंबा मिळवणारी पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली या हल्ल्यात नष्ट झाली, ज्यामुळे भारताला एकतर्फी फायदा झाला.
इतर महत्वाच्या बातमया
























