Youth Employment NITI Aayog Report Marathi News: भारतामधील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत असल्याची माहिती समोर आली आहे. 2021 च्या आकडेवारीवर आधारित नीती आयोगाचा अहवाल (Youth Employment NITI Aayog Report) समोर आला आहे. निती आयोगाच्या एका रिपोर्टनुसार, भारतात असलेली जवळपास 9 करोड तरुणाई काहीही करत नाही. ही लोक शिक्षण घेत नाहीत किंवा नोकरी, व्यवसाय करत नाही. यामध्ये उद्योजकता कौशल्ये आणि नववीपासून व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्याची आयोगाची शिफारस देखील करण्यात आली आहे. 15 ते 29 वयोगटातील 11 टक्के तरुण ना शिक्षण घेतायत, ना नोकरी करत आहेत. तर पदवीधरांपैकी केवळ 8.25 % तरुणांनाच पात्रतेशी सुसंगत नोकरी मिळाली आहे. 15 ते 29 वयोगटातील 88 टक्के तरुण घरगुती कामात गुंतलेले आहेत. नीती आयोगाच्या अहवालात याबाबत विदारक वास्तव मांडण्यात आले आहे. (Youth Employment NITI Aayog Report Marathi News)

Continues below advertisement

अहवालात महाराष्ट्राच्या महास्वयम आणि तामिळनाडूच्या नान मुदवलन योजनेचे कौतुक करण्यात आले आहे. 2014 नंतर 7.67  कोटींहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नीती आयोगाच्या ताज्या हवालानुसार, 2014-15 पासून आतापर्यंत देशात 7.67 कोटींहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही गती कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांच्या माध्यमातून कौशल्य विकासाशी संबंधित खर्चासाठी 34,000 कोटींची तरतूद केली आहे. तमिळनाडूची ‘नान मुदलवन’ आणि महाराष्ट्राची ‘महास्वयम्’ यांसारख्या राज्यस्तरीय योजनांनीही या प्रयत्नांना पूरक भूमिका बजावली आहे. (India Youth Employment)

पदवीधरांपैकी केवळ 8.25 टक्के तरुण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी सुसंगत नोकऱ्यांमध्ये कार्यरत- (Youth Employment Marathi News)

अंदाजे 8.7 कोटी भारतीय तरुण 'नीट' (NEET — Not in Education, Employment or Training) या गटात मोडतात, म्हणजेच 15 ते 29 वयोगटातील जवळपास 11 टक्के भारतीय ना शिक्षण घेत आहेत, ना नोकरी करत आहेत, ना प्रशिक्षण घेत आहेत. हा आकडा 2021 मध्ये झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणावर आधारित आहे. पदवीधरांपैकी केवळ 8.25 टक्के तरुण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी सुसंगत नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत, तर सुमारे 88 टक्के 'नीट' तरुण घरगुती काम आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांत गुंतलेले आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Continues below advertisement

उत्पन्नाचा अभाव आणि आधीच्या शिक्षणावर झालेला खर्चांमुळे तरुण अडकतात- (Youth Employment NITI Aayog Report Marathi News)

अहवालानुसार, उत्पन्नाचा अभाव आणि आधीच्या शिक्षणावर झालेला खर्च यामुळे हे तरुण अडकतात. विद्यार्थ्यांना आधीच्या आर्थिक जबाबदाऱ्यांवर सशुल्क कौशल्य प्रशिक्षणाचा अतिरिक्त भार पेलणे अनेकदा शक्य होत नाही. गरिबी, कौटुंबिक दबाव, असुरक्षित वाहतूक, करिअर मार्गदर्शनाचा अभाव आणि लवकर विवाह ही या समस्येमागील प्रमुख कारणे अहवालात नमूद करण्यात आली आहेत. उपाय म्हणून, नीती आयोगाने सहावी ते बारावीपर्यंत रोजगारक्षमता आणि उद्योजकता कौशल्ये आणि नववीपासून व्यावसायिक शिक्षणाचे मार्ग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. 2014-15 पासून आतापर्यंत 7.67 कोटींहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत, VIDEO:

संबंधित बातमी:

गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त