Allahabad High Court on Live in Relationship : 'लिव्ह-इन रिलेशनशिपला (Allahabad High Court on Live in Relationship) सामाजिक मान्यता नाही. तरीही तरुण अशा नात्यांकडे आकर्षित होतात. कारण, पुरुष असो वा स्त्री, दोघांनाही आपल्या जोडीदाराप्रती जबाबदारी टाळायची असते. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपकडे तरुणाईचे आकर्षण वाढत आहे. आता आपण सर्वांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील नैतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी काहीतरी चौकट आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशा शब्दात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपवर टिप्पणी केली.
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...
न्यायमूर्ती नलिन कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने पीडितेविरुद्ध लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला. एफआयआरनुसार आरोपीने पीडितेचा गर्भपातही करून घेतला. जातीसंबंधित टिप्पण्या केल्या. तसेच मारहाण केल्याचा आरोप होता. या खटल्यात जामीन मिळावा यासाठी आरोपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फिर्यादीचा दावा खोटा असून या प्रकरणातील पीडित महिला प्रौढ महिला होती, असे वकिलाने सांगितले. दोघांमधील सर्व संबंध सहमतीचे होते. आरोपीच्या संमतीशिवाय किंवा स्वेच्छेशिवाय त्यांच्यात शारीरिक संबंध कधीच झाले नाहीत,असेही वकिलाने सांगितले.
पीडिता 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती
पीडितेवर सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले की, तुम्ही सुमारे 6 वर्षे आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. गर्भपाताची कथित वस्तुस्थिती ही केवळ निराधार आरोप होता. आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन दिले नाही किंवा कधीच दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुम्ही दोघेही सहमतीने नात्यात होता. आता तक्रार का करताय? समाजात नैतिक मूल्ये जपण्यासाठी काही चौकट आणि उपाय शोधण्याची गरज हायकोर्टाने व्यक्त केली. आरोपी एक प्रौढ महिला आहे, तिचे आरोपीसोबत संमतीने संबंध होते, असेही न्यायालयाने सांगितले.
नोएडामध्ये लिव्ह-इन पार्टनरने आत्महत्या केली
याआधी नोएडामधील अभियंत्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासोबत 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले की, मयंक चंदेल (27, मूळचा शाहजहांपूर जिल्ह्यातील जलालाबादचा रहिवासी आहे) याने 13 डिसेंबर रोजी नोएडा येथील सेक्टर-73 येथील महादेव अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती, जिथे तो प्रीती सागर नावाच्या मुलीसोबत राहत होता. सेक्टर-113 पोलिस स्टेशनचे प्रभारी कृष्ण गोपाल शर्मा यांनी सांगितले की, मयंकच्या आईने रात्री तक्रार दाखल केली असून, तिने प्रीतीवर आपल्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. प्रीती मयंकला टोमणे मारत असे, त्यामुळे कंटाळून त्याने हे पाऊल उचलले, असा आरोप केला आहे. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या