नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार करुन तिला कारमधून फेकून देण्यात आलं. हरियाणातील गुरुग्राममध्ये बलात्कार करण्यात आला आणि ग्रेटर नोएडामध्ये आणून फेकून देण्यात आलं.

पीडित महिला गंभीर असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महिलेचं हरियाणातील सोहना येथून अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवर तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि सकाळी तिला रस्त्यावर फेकून देण्यात आलं.

https://twitter.com/ANINewsUP/status/877004224764100609

पोलिसांना बेशुद्ध अवस्थेतील या महिलेची माहिती मिळताच तातडीने तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. यानंतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सोहना येथून जबरदस्तीने तीन तरुणांनी स्विफ्ट कारमध्ये बसवलं. तिन्हीही नराधमांनी शारीरिक अत्याचार केले आणि कारमधून बाहेर फेकलं, अशी माहिती पीडितेने दिली. महिलेचं वय अंदाजे 35 वर्षे आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.