नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेतून भारतासाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या दबावापुढे अखेर पाकिस्तान झुकलं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली. त्यामुळे अभिनंदन उद्या भारतात परतणार आहेत. अभिनंदन वर्धमान यांची दोन दिवसांनी सुटका होणार आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र

VIDEO | पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा | एबीपी माझा



पाकिस्तानची भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या कारवाईत वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. हा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात होतं.

भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष सापडले

भारताचा दबाव, पाकिस्तान झुकलं
यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. तणाव कमी करण्यासाठी आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं पाकिस्तानने म्हटलं होतं. तर कोणत्याही वाटाघाटीशिवाय आमच्या वैमानिकाला भारतात सुरक्षित पाठवा, असं भारताने खडसावलं. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत वैमानिक अभिनंदन यांची सुटका करण्याचं जाहीर केलं.

गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेला वैमानिक

संसदेत इम्रान खान म्हणाले की, ''शांतीचा संदेश देताना आम्ही भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका करु." इम्रान खान यांच्या या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित खासदारांनी ताळ्या वाजवून स्वागत केलं.

इम्रान खान यांची घोषणा



संबंधित बातम्या


जिनिव्हा करार : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला परत आणण्याचा मार्ग


पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती


भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती


पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, बडगाममधील चॉपर पाडलं नसल्याची कुबली


पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही


डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं


...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं