Bangladesh Protest: बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचार आणि जाळपोळीने हादरला आहे. बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे, मध्यरात्रीपासून विविध शहरांमध्ये (Bangladesh Protest) जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचार सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. दंगलखोर भारतीय कार्यालयांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करत आहेत. चितगावमधील भारतीय उच्चायुक्तालयावर दगडफेक करण्यात आली आहे. निदर्शकांनी भारतविरोधी घोषणाबाजी केली आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना खुलेआम खुनाच्या धमक्या दिल्या जात आहेत.ग्रेटर बांगलादेशचा नकाशा प्रसिद्ध करणाऱ्या उस्मान हादी याच्या हत्येने बांगलादेशमध्ये (Bangladesh Protest) अशांतता निर्माण झाली आहे.(Bangladesh Protest)

Continues below advertisement

Osman Hadi Death: बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनातील प्रमुख नेता शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू

बांगलादेशातील राजकारण आणि विद्यार्थी चळवळींशी संबंधित एक मोठी घटना समोर आली आहे. 2024 मधील चर्चित विद्यार्थी विद्रोहात महत्त्वाची भूमिका बजावणारा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याचे काल (गुरुवारी 18 डिसेंबर 2025) निधन झाले. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यात झालेल्या गोळीबारात झालेल्या गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बांगलादेशात शोककळा पसरली असून, अनेक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बांगलादेशात हिंसाचार उसळला आहे.

सिंगापूर सरकारच्या माहितीनुसार, गंभीर अवस्थेत असलेल्या शरीफ उस्मान हादी याला 15 डिसेंबर 2025 रोजी तातडीने सिंगापूरला हलवण्यात आले होते. त्याला पुढे उपचारांसाठी सिंगापूर जनरल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जिकल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. राष्ट्रीय न्यूरो सायन्स संस्थेशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत होती. मात्र, सर्व वैद्यकीय प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर 18 डिसेंबर रोजी त्यानी अखेरचा श्वास घेतला.

Continues below advertisement

Osman Hadi Death: ढाक्यात दिवसाढवळ्या गोळीबार

शरीफ उस्मान हादी याच्यावर 12 डिसेंबर 2025 रोजी ढाक्यात दिवसाढवळ्या हल्ला झाला होता. तो पलटन परिसरातील कल्व्हर्ट रोडवरून ऑटो-रिक्षाने प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळी थेट त्याच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक पातळीवर उपचार अपुरे पडत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला सिंगापूरला एअरलिफ्ट करण्यात आले होते. अनेक दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता.

Osman Hadi Death: कोण होते शरीफ उस्मान हादी?

शरीफ उस्मान हादी हा बांगलादेशातील शेख हसीना विरोधी विद्यार्थी आणि युवक संघटना ‘इंकलाब मंच’चा प्रमुख नेता म्हणून ओळखला जात होता. तो या संघटनेचे प्रवक्तेहा होता. आगामी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ते ढाका-8 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होता. जुलै 2024 मध्ये झालेल्या व्यापक विद्यार्थी विद्रोहात इंकलाब मंच हे नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. या आंदोलनाने तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेला थेट आव्हान दिले होते. हादी हे या आंदोलनातील आक्रमक आणि प्रभावी वक्ता म्हणून ओळखले जात होता.

Osman Hadi Death: सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी

शरीफ उस्मान हादी याचा जन्म बांगलादेशातील झलकाठी जिल्ह्यात झाला. त्याचे कुटुंब धार्मिक आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जात होते. त्याचे वडील मदरसा शिक्षक होते. वडिलांकडूनच हादीला शिस्त, अध्ययनशीलता आणि नैतिक मूल्यांचे संस्कार मिळाले. त्यानी आपले प्राथमिक आणि धार्मिक शिक्षण नेसराबाद कामिल मदरसा येथून पूर्ण केले होते.

इंकलाब मंच या संघटनेभोवती बांगलादेशाच्या राजकारणात कायमच वादाचे वातावरण राहिले आहे. काही वेळा या संघटनेवर कट्टरपंथी विचारसरणीचा आरोप करण्यात आला. 2024 च्या विद्यार्थी आंदोलनानंतर स्थापन झालेल्या अंतरिम सरकारने इंकलाब मंच बरखास्त केला होता आणि या संघटनेला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घातली होती. मात्र, संघटनेशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते राजकीय हालचालींमध्ये सक्रियच राहिले.

Osman Hadi Death: मृत्यूनंतर बांग्लादेशात तणावाचे वातावरण

शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर ढाका तसेच इतर शहरांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्याच्या समर्थकांनी हा मृत्यू राजकीय कट असल्याचा आरोप केला असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी शहरातील काही संवेदनशील भागांत बंदोबस्त वाढवला आहे.

बांगलादेशातील चार शहरांमध्ये ढाका, राजशाही, खुलना आणि चितगाव येथे भारतीय उच्चायुक्तालयातील व्हिसा प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. २०२४ च्या शेख हसीना यांच्या विरोधातील चळवळीतील प्रमुख असलेल्या कार्यकर्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मध्यरात्रीपासून निदर्शने, जाळपोळ सुरू झाली. हादी भारताकडे शत्रुत्वाने पाहत होते, त्यांनी वारंवार भारताविरोधात विधाने केली आहेत.