Cold Out Cough Syrup : खोकल्याच्या उपचारासाठी तुम्ही कोणतेही कफ सिरप वापरत असाल तर काळजी घ्या. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका भारतीय कफ सिरपबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. भारतातील कोल्ड आऊट (Cold Out) हे कफ सिरप (Cough Syrup) धोकादायक असल्याचं WHO नं म्हटलं आहे. कोल्ड आऊट, भारतात बनवलेले कफ सिरपबद्दल WHO धोक्याचा इशारा दिला असून हे कफ सिरप कमी दर्जाचं असल्याचं म्हटलं आहे. या भारतीय कफ सिरपवर इराकमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याआधीही भारतात बनवलेल्या अनेक कफ सिरपवर इतर देशात बंदी घालण्यात आली आहे.


भारतातील कोल्ड आऊट कफ सिरप धोकादायक


पॅरासिटामॉल आणि क्लोरफेनिरामाइनच्या मिश्रणातून बनवलेले कफ सिरप हे सामान्य सर्दी, खोकला आणि ऍलर्जीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. पण कोल्ड आऊट हे कफ सिरप सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत WHO ने ठरवलेल्या मानकांपासून वेगळं आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराकमध्ये नुकतेच बंदी घालण्यात येणारे खोकल्याचं औषध कोल्ड आऊट (Cold Out) फोर्ट्स इंडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडसाठी Dabilife Pharma Pvt Ltd ने तयार केलं आहे. 


कफ सिरपमध्ये काय आढळलं?


डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या कफ सिरपमध्ये एथिविन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकोल या दोन्ही घटकांची मात्रा ठराविक मर्यादेपेक्षा 0.10 टक्के अधिक आहे. हे कोणासाठीही धोकादायक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या औषधाचा वापर लोकांचे आरोग्य गंभीरपणे बिघडवू शकत नाही तर मृत्यू देखील होऊ शकतो.


भारतीय कफ सिरपवर याआधीही प्रश्न उपस्थित


सर्वात आधी, ऑक्टोबर 2022 मध्ये गांबियामध्ये 70 मुलांचा मृत्यू झाला तेव्हा ते हरियाणाच्या मेडेन फार्माने तयार केलेल्या कफ सिरपशी यांचा संबंध जोडला गेला होता. त्यावेळीही WHO ने या वैद्यकीय उत्पादनाबाबत अलर्ट जारी केला होता. यानंतर, डिसेंबर 2022 मध्ये, उझबेकिस्तान सरकारने येथे 18 मुलांच्या मृत्यूसाठी मेरियन बायोटेक लिमिटेड जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये, WHO ने मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या QP फार्माकेमच्या सिरपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यानंतर, जून 2023 मध्ये कॅमेरूनमध्ये काही मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचा संबंध भारतात बनवलेल्या कफ सिरपशीही जोडला गेला.


संबंधित इतर बातम्या : 


Cough Syrup : भारतनिर्मित आणखी एक कफ सिरप दूषित असल्याचा WHO चा दावा, अलर्ट जारी; पंजाबमधील कंपनीने आरोप फेटाळाले